इंदापूर प्रतिनिधि: आज दिनांक २३ सप्टेंबर२०२३ रोजी आपल्या श्रीमती हिराबाई हरिभाऊ देसाई विद्यालय बेलवाडी मध्ये १४ वर्ष वयोगटातील( मुले, मुली) कबड्डी स्पर्धांचे उद्घाटन तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते झाले.
यावेळी प्रताप पाटिल ,सचिन सपकळ, संचालक सर्जेराव जामदार , शुभम निंबाळकर, सरपंच मयुरीताई शरद जामदार, उपसरपंच नामदेव इतापे, सुनिल देसाई, किर्तीकुमार जामदार, पंकज जामदार, अनिल कदम ,प्रकाश शेळके, अनिल पवार, संजय पवार, इंदापुर क्रिडा प्रमुख महेश चावले, इंदापुर तालुका क्रिडा अध्यक्ष शरद झोळ व उपाध्यक्ष व शाळेचे मुख्याध्यापक निंबाळकर बी. एस. व विद्यालयाचे क्रिडा प्रमुख जामदार सर तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
आपल्या भाषणातुन भरणेमामांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व सांगितले .
विद्यालयाचे मुख्याध्यापक निंबाळकर सर यांनी सर्व उपस्थितांचे शाल व श्रीफळ हार देऊन त्यांचा करून सन्मान केला.या.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जामदार सर यांनी केले.

