श्रीरामपूर प्रतिनिधी:
श्रीरामपूर शहराच्या मध्येभागातून रेल्वेलाईन गेलेली असल्याने रेल्वेलाईनमुळे शहर दोन भागात विखुरले गेले आहे,सध्या रेल्वेचे विकासकामे ही युद्धपातळीवर सुरु असुन रेल्वे रुळांचा विस्तार केला जात असल्याने रेल्वे खात्याने शहरातील रेल्वेलाईनच्या उत्तर आणि दक्षिणेस असलेल्या घर आणी दुकानांनी जागा मोकळी करण्याकामी (पी.पी.ई.नुसार) नोटीसा धाडल्या असल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
याबाबत नुकतेच येथील व्हीआयपी रेस्ट हाऊसवर घर बचाव संघर्ष समिती आयोजित सर्वपक्षीय कार्यकर्ते, पत्रकार, समाजसेवक आणी संबंधीत घर/ दुकानदार यांची मिटिंग संपन्न झाली.त्यात ठरल्या प्रमाणे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरीता
येत्या ३० सप्टेंबर रोजी येथील रेल्वे स्टेशन जवळील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून भव्य मोर्चा काढला जाणार आहे,यासाठी घर बचाव संघर्ष समितीचे पदाधिकारी संबंधित परिसरातील घर,घर दुकाने,दुकाने जावून घर बचाव संघर्ष समितीची भुमिका आणी ३० तारखेच्या होणाऱ्या मोर्चा चे आयोजन याबाबत सविस्तर माहिती देत आहे. तथा या मोर्चात नागरीकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे घर बचाव संघर्ष समितीच्यावतीने अवाहनही करण्यात आले आहे.
घर बचाव संघर्ष समितीद्वारे रेल्वेच्या (उत्तर/दक्षिण) दोन्ही बाजूच्या नागरिकांना सूचित करण्यात येते की, रेल्वे प्रशासनाने उत्तर बाजू १२५ मिटर व दक्षिण बाजू ९१ मीटर अशी आपली हद्द दर्शविली व सांगितलेली आहे, त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून सूतगिरणी फाटका पासून ते डॉ. कुटे हॉस्पिटल (उड्डाणपूल) पर्यंत सर्वांना नोटिसा द्यायचे काम चालू आहे, डॉ. कुटे हॉस्पिटल परिसर आणि मार्केट कमिटी समोरील परिसर जरी काही लोकांना नोटीसा मिळाल्या नसल्यातरी त्या आज ना उद्या मिळणारच आहेत,त्यामुळे शनिवार दि. ३० सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता होत असलेल्या या मोर्चात न चुकता हजर रहावे, येतानी नोटिसची झेरॉक्स प्रत सोबत आणावी, हा प्रश्न सर्व घरांचा आणि दुकानांचा व्यापाऱ्यांचा, खाजगीजागा मालकांचा आहे, तरी मोर्चासाठी सर्व नागरीकांनी आवर्जून उपस्थीत रहावे असेही घर बचाव संघर्ष समितीच्यावतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
*सहयोगी:
जाफरभाई शाह - श्रीरामपूर
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111