श्रीरामपूर प्रतिनिधी:
दि.०८ऑक्टोबर १९०९ ते २८'जून २००२'या कालखंडातील एक सेवाभावी आणि श्रीरामपूर शहराच्या प्रारंभिक जडणघडणीत वैद्यकीय योगदान असणारे डॉ. वा. ग. तथा बाबासाहेब कल्याणकर यांच्या ११४ व्या जयंतीनिमित्त व्याख्यानमालेचे दुसरे विचारव्याख्यान दि. ०८ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १०.३० वा. येथील बोरावकेनगर, वॉर्ड नं. ०१, विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे कार्यालय परिसरात आयोजित करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळेसर यांनी दिली.
राहुऱी येथील साई आदर्श मल्टीस्टेट संस्थापक, कार्याध्यक्ष शिवाजीराव शंकराप्पा कपाळे हे उदघाटक असून ॲड. रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष माजी प्राचार्य टी. ई. शेळके, बालरोगतज्ज्ञ, वीरशैव लिंगायत समाजाचे कार्यकर्ते डॉ. प्रकाश मेहकरकर ह्यांची प्रमुख उपस्थिती आहे. अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे माजी मॅनेजिंग कौन्सिल सदस्य व साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये हे असणार असून या व्याख्यानमाला कार्यक्रमास उपस्थित राहवे असे आवाहन आयोजक व प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. राजीव रावसाहेब शिंदे, संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे यांनी केले.
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

