shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नागपंचमी निमित्त भव्य मेहंदी स्पर्धेचे आयोजन


शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन )
 सामाजिक बातमी

विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये सांस्कृतिक विभागातर्फे नागपंचमी निमित्त भव्य मेहंदी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

मेहंदी स्पर्धेचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. धनंजय काळे आणि श्री. योगेश कोठावदे यांनी केले. स्पर्धेमधील भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे स्पर्धा दोन विभागांमध्ये घेण्यात आली.

पहिल्या विभागामध्ये इयत्ता पाचवी ते सातवी मधील 390 विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. त्यापैकी इयत्ता पाचवी गटामधून सायली पटेल (प्रथम), भुषा बेग (द्वितीय), श्रावणी तृतीय) तसेच विद्यार्थ्यांमधून मंजेश कुमार या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकावला. सकाळ सत्रातील मेहंदी स्पर्धेचे परीक्षण श्रीमती संजीवनी आंबेकर, श्रीमती वैशाली ढाकणे, श्रीमती वैजयंती जगताप यांनी केले.

स्पर्धेच्या दुसऱ्या सत्रामध्ये आठवी ते दहावीच्या 160 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेत आठवी गटामधून आयेशा शेख (प्रथम), वैष्णवी कांबळे (द्वितीय), किरण गौतम (तृतीय), इयत्ता नववी गटामधून अविष्का लोखंडे (प्रथम), सभा शेख (द्वितीय), वैष्णवी मडके (तृतीय), दहावी गटामधून सायली सुतार (प्रथम), कोमल वरगुडे (द्वितीय), आणि सोनल गुरव (तृतीय) क्रमांक पटकावले. स्पर्धेचे परीक्षण श्रीमती स्नेहलता कांबळे, श्रीमती किरण मस्के आणि श्रीमती स्वाती व्हरांबळे यांनी केले.

स्पर्धा संपल्यानंतर लगेचच स्पर्धेचा निकाल जाहीर करून विजेत्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रके आणि बक्षीस देऊन गौरविण्यात करण्यात आले.

कार्यक्रमासाठी प्रशालेचे प्राचार्य श्री. उदय महिंद्रकर, पर्यवेक्षक श्री. विजय रसाळ, श्री. श्रीनिवास गजेंद्रगडकर, पर्यवेक्षिका श्रीमती क्षमा देशपांडे, शिक्षक प्रतिनिधी श्रीमती ज्योती डामसे, शिक्षकेतर प्रतिनिधी श्रीमती संजीवनी आंबेकर, सांस्कृतिक समिती प्रमुख श्री. धनंजय काळे, श्री. योगेश कोठावदे, ज्येष्ठ शिक्षक श्री. अनिल खामकर आणि श्री. संजय पालवे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. योगेश कोठावदे तर उपस्थितांचे आभार श्री. धनंजय काळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सेवक श्री. गजानन कदम यांचे सहकार्य लाभले.

सहभागी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे नियामक मंडळ अध्यक्षा डॉ. मृणालीनी गरवारे, डॉ. सतीश गवळी, सहकार्यवाह श्री. विजयजी भुरके, शाळा समिती अध्यक्ष तथा नियामक मंडळ सदस्य श्री. भगवानभाऊ आंबेकर यांनी कौतुक केले.
close