shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भिमाई आश्रमशाळेत महिला दिन उत्साहात संपन्न.*

*भिमाई आश्रमशाळेत महिला दिन उत्साहात संपन्न.*
*इंदापूर* :(दि.८) मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट इंदापूर संचलित प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक आश्रमशाळा तसेच मुलांचे व मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन  डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात प्राचार्या अनिता साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला.
याप्रसंगी आश्रमशाळेतील मुलींनी महिला दिनाच्या कार्यक्रमाचे  नियोजन केले. यावेळी विद्यार्थींनींनी बहुजन महामातांच्या प्रतिमांना पुष्पहार व संस्थेचे दिवंगत अध्यक्ष रत्नाकर मखरेंच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विद्यार्थीनींनी कर्तबगार महिलांविषयी कविता गायन तसेच भाषणं देखील केले.
याप्रसंगी  शिक्षक नानासाहेब सानप यांनी जागतिक महिला दिनाचे महत्त्व सांगितले.भारतातील कर्तबगार महिलांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली तसे त्यांच्यापासून प्रेरणा व त्यांचे आदर्श घेण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले. यावेळी शाळेतील महिला शिक्षकांचा सन्मान करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. 
सदर कार्यक्रमास संस्थेचे सचिव ॲड. समीर मखरे, मुख्याध्यापक साहेबराव पवार, प्राचार्या अनिता साळवे,सविता गोफणे, मनीषा मखरे, मेघा यादव,नीता जगताप तसेच संस्थेतील सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
close