प्रकाश मुंडे /बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याच्या विकासाला चालना देणारा प्रत्येक क्षेत्रासाठी आर्थिक तरतूद असणारा हा अर्थसंकल्प असून या मध्ये रस्ते, कृषी धोरण ,जलसंधारण, मेट्रो, विमानतळ ,नदीजोड प्रकल्प ,विद्युत निर्मिती ,सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प विशेषतः शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी ए .आय. योजना राबवण्यात येणार आहे .रस्ते बांधणीच्या माध्यमातून सात हजार किलोमीटर काँक्रीट रस्ते व पंधरा हजार किलोमीटर डांबर रस्ते करण्याचे प्रयोजन अर्थसंकल्पात ठेवलेला आहे.
सदरील अर्थसंकल्पात महत्वपूर्ण असा नदी जोड प्रकल्प या माध्यमातून हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्याचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांसाठी विद्युत निर्मिती सोबतच मुख्यमंत्री मोफत बळीराजा वीज योजना राबवण्यात येत आहे .तसेच सामाजिक व आदिवासी विभागात भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. त्यामध्ये वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येणार आहेत महिलांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी लखपती दीदी योजना राबविण्यात येणार आहे या सर्व बाबींचा विचार करता राज्यामध्ये रोजगार निर्मितीवर ही भर देण्यात आलेला आहे .त्या माध्यमातून हजारो युवकांना रोजगार निर्मिती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे 2025/ 2 6 अर्थसंकल्प संतुलित प्रकारचा अर्थसंकल्प असून नक्कीच हा अर्थसंकल्प महाराष्ट्राला विकासाकडे घेऊन जाईल याची खात्री आहे असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती डॉ .वासुदेव नेहरकर यांनी म्हटले आहे.