वझर खुर्दचे सामाजिक कार्यकर्ते भास्कर चोरमारे यांची गटविकास अधिकाऱ्याकडे निवेदनाव्दारे मागणी
सेनगांव/विश्वनाथ देशमुख
सेनगांव तालुक्यातील वझर खुर्द येथील जल जीवन मिशन अंतर्गत पुर्नजोडणी नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामात कुचराई करणाऱ्या कंत्राटदरावर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे दि.२६ मार्च बुधवार रोजी सेनगांव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माधव कोकाटे व पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद हिंगोली यांच्याकडे करण्यात आली आहे.
सन २०२१-२२ या कालावधीत जलजीवन मिशन अंतर्गत वझर खुर्द येथे पुर्नजोडणी नळ योजना पुरवठा कामास मंजुरी मिळाली असून तेव्हापासून संबंधित कंत्राटदाराने फक्त विहीर खोदकाम व बांधकाम केले असून गावात ५० टक्के पाईपलाईन केली आहे तसेच पाण्याच्या टाकीसाठी गावाच्या मध्यभागी टाकीचा खड्डा खोदल्यामुळे गावात येण्या जाण्यासाठी पूर्ण रस्ता बंद झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.पंचायत समिती येथे आ.तानाजीराव मुटकुळे यांच्या अध्यक्षतेखाली दि.१७ फेब्रुवारी रोजी झालेल्या तालुका पाणीटंचाई आढावा बैठकीत मी सरपंच प्रतिनीधी म्हणुन सदर बैठकीत मी आमदार साहेब यांच्याकडे सदरचा मुद्दा उपस्थित केला होता त्यावर आमदार साहेबांनी श्री सांळुके साहेब गटविकास अधिकारी यांना सदरचे काम पुर्ण करण्याच्या सुचना दिल्या होत्या तसेच याबाबत अनेक वेळा पाठपुरावा करण्यात आला मात्र कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही तसेच संबधीत कंत्राटदाराने हे काम घेतले असुन इतर खाजगी लोकांना सदरचे काम दिले आहे.त्या काम करणाऱ्या व्यक्तींना आम्ही रखडलेल्या कामाबद्दल विचारणा केली असता ते आम्हालाच धमक्या देत आहेत "सरपंच तुम्हाला काय करायचे ते करा कुठे ही जा आम्हाला वाटेल तेव्हा आम्ही काम करु तुला बघुन घेऊ" अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जातात असा आरोप सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते भास्कर चोरमारे यांनी केली आहे.तसेच निवेदनात म्हटले आहे की संबंधित विषयाकडे तात्काळ लक्ष द्यावे अन्यथा दि.४ एप्रिल रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.
तसेच या कामांमध्ये कुचराई करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करून त्याचे लायसन्स रद्द करून वझर खुर्द गावातील जलजीवन मिशन अंतर्गत रखडलेली कामे तात्काळ इतर कंत्राटदारांना देऊन तात्काळ चालू करावे व गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ सोडवावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.