श्रीरामपूर / प्रतिनिधी:
संगमनेर येथील विद्या विद्यापीठाच्या वतीने महिला दिनानिमित्त श्रीरामपूर येथील निर्मला पालवे- आघाव यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
रयत शिक्षण संस्थेच्या खंडाळा (ता. श्रीरामपूर) येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्या उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. संगमनेरच्या माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांच्याहस्ते व उद्योजिका आणि समाजसेविका पद्मश्री कल्पना सरोज यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील शिक्षिकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी विद्या विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. नामदेवराव गुंजाळ, व्हिजन कोचिंग इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक डॉ. हर्षवर्धन गुंजाळ, विद्या गुंजाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
श्रीमती पालवे या १७ वर्षांपासून रयत शिक्षण संस्थेमध्ये विद्यादानाचे कार्य करीत आहेत. कैलासपती आघाव यांच्या त्या पत्नी आहेत. त्या शिस्तप्रिय व विद्यार्थी प्रिय शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात. या पुरस्काराचे श्रेय त्यांनी वडील शेवगावचे माजी सभापती दिवंगत अर्जुनराव पालवे, आई, सासरे ज्ञानदेव आघाव गुरूजी यांना दिले आहे. मधुकर पालवे व प्रा. शरद पालवे यांच्या त्या भगिनी आहेत. त्यांना आदर्श शिक्षिका या पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल शाळा समितीचे अध्यक्ष भागवतनाना ढोकचौळे, तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजूकाका चव्हाण, विद्यालयाचे मुख्याध्यापक बत्तीसे, माजी मुख्याध्यापक बर्डे, बनसोडे, सर्व शिक्षक वृंद तसेच शाळा समितीचे पदाधिकारी यांनी त्यांचे कौतुक केले आहे. त्या माजी मुख्याध्यापक ज्ञानदेव आघाव व माजी मुख्याध्यापिका दिवंगत मालन आघाव यांच्या स्नुषा आहेत.
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111