shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वाशिमच्या पालकमंत्री पदी क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे विराजमान; महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून अधिकृत घोषणा

वाशिमच्या पालकमंत्री पदी क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे विराजमान; महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून अधिकृत घोषणा

इंदापूर : इंदापूरचे विधानसभा मतदारसंघाचे आमदार व क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांची वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसा शासन आदेश पारित करण्यात आला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून शासन निर्णय क्रमांक जिपार्म-१३२४/प्र.क्र.४७/२.वका.-२. दि.१८.०१.२०२५, यामध्ये अंशतः बदल करुन मंत्री दत्तात्रय भरणे यांची वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री नियुक्ती करण्यात येत असल्याचे परिपत्रक बुधवारी (दि.२६) काढण्यात आले आहे.

   राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी काही दिवसांपूर्वी वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर रिक्त झालेल्या वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असताना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे इंदापूरचे आमदार क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांचे नाव आघाडीवर होते. या चर्चेला आला पुर्णविराम मिळाला आहे.
close