प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी :-
कोविड काळात बीड जिल्ह्यातील रुग्णांना सेवा देण्यासाठी राज्य शासन,केंद्र शासन प्रयत्न करत होते. त्या काळात शासनाने इतर सर्व खात्याचे निधी आरोग्य विभागाकडे वर्ग करण्यात आला होता. तो निधी रुग्णांना सुविधा व औषधी खरेदी करण्यासाठी दिला होता. परंतु तो निधी रुग्णांच्या औषधी वर खर्च न करता इतरत्र करणयात आला. त्यामधून खुप मोठा भ्रष्टाचार केला गेला .औषधासाठी आलेला निधी, CCTV, पडदे खरेदी,व इतर दुरुस्ती च्या नावाखाली खर्च केला असे दाखवून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला.
औषधी व इतर खरेदी करताना त्याच्या परवानग्या न घेता खर्चामध्ये अनियमितता केली व अपहार केला असे शासनाच्या ऑडिट रोपोर्ट मध्ये सिद्ध झाले आहे. या सर्व खरेदी विक्री झालेल्या प्रकरणात गेली कित्येक दिवस चौकशी सुरू आहे त्याचा पाठपुरावा आ. नमिता मुंडदा यांनी गेल्या 04 वर्षांपासून करत आहेत. त्यामध्ये 15 ते 20 पत्र त्यांनी आरोग्य विभागात दिले आहेत , त्यामध्ये डॉ अशोक थोरात हे दोषी आहेत असे अहवालात लेखी स्वरूपात शासनाने दिले आहे. तरी त्यांच्यावर कार्यवाही होत नव्हती म्हणून आ .नमिता मुंदडा यांनी लक्षवेधी लावली त्यामध्ये मा. आरोग्यमंत्री यांनी डॉ अशोक थोरात यांचे निलंबन केले. जर एखादा अधिकारी भ्रष्टाचार करत असेल ,शासकीय सेवेत असताना राजकारण करत असेल ,सर्वसामान्य रुग्णांच्या कोरोनासारख्या महामारीत पैसे खात असेल तर त्याच समर्थन करायचं का,त्याला जातीय स्वरूप द्यायचा का हा प्रश्न जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला पडला आहे. कोवीड काळातील औषधी , ऑक्सीजन निर्मिती प्लॅंट ,सॅनिटायझरी आधीच्या बाबतीत झालेला खर्च वादात आलेला आहे .
सॅनिटायझरच्या नावाखाली कोटीच्या कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे.त्यामुळे आ.नमिता मुंदडा यांनी गैरकारभार करणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याला तो कोणत्याही समाजाचा असो पाठीशी घालणार नाही असा कडक संदेश या माध्यमातून दिला आहे.