(सेनगाव/विश्वनाथ देशमुख)
सेनगाव तालुक्यातील कोंडवाडा येथे शेत पांदण रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या हस्ते दि. १७ मार्च, सोमवार रोजी संपन्न झाले. भूमिपूजनानंतर लगेचच प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली.
🛣️ शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक पायाभूत सुविधा
शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत पोहोचण्यासाठी चांगला आणि मजबूत रस्ता मिळावा, यासाठी हा "शेत पांदण रस्ता अभियान" हाती घेण्यात आला आहे. या अभियानाचा मुख्य कार्यक्रम कोंडवाडा येथे पार पडला.
रस्त्याच्या माती व दबई कामाला सुरुवात झाली असून, हे काम पूर्ण झाल्यानंतर मनरेगा योजनेअंतर्गत खडीकरण व मजबुतीकरणासाठी प्रस्ताव दाखल करण्यात येणार आहेत.
🌟 आमदार मुटकुळे यांचे प्रतिपादन
"शेतकऱ्यांसाठी चांगला पांदण रस्ता तयार करणे ही काळाची गरज आहे. या अभियानासाठी मी जितका उत्सुक आहे, तितकेच शेतकरी बांधवही मोठ्या उत्साहाने सहकार्य करत आहेत," असे मत आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी व्यक्त केले.
👥 मान्यवरांची उपस्थिती आणि नागरिकांचा सहभाग
या कार्यक्रमाला हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल, गिरधारीजी तोष्णीवाल, तसेच ग्रामस्थ आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.