फिर्यादी महिलेला अरेरावी
सामाजिक कार्यकर्ते मोहन शेगर यांनी केली जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार.
सोनई प्रतिनिधी
दिनांक १६ रोजी रात्री ८:३० वाजण्याच्या दरम्यान अहिल्यानगर ते संभाजीनगर महामार्गावर घोडेगाव या ठिकाणी बस स्थानक जवळ हॉटेल मीरा समोर टेम्पो ट्रॅव्हल व कार या वाहनाचा अपघात झाला. यामध्ये कारचे मोठे नुकसान झाले कारचे चालक शैलेश टिळेकर यांना किरकोळ स्वरूपाची दुखापत झाली. त्यानंतर टिळेकर यांनी 112 नंबर वर कॉल करून मदत मागितली त्यानंतर जवळच असलेले सोनई पोलीस ठाण्याचे कर्मचारी दाखल झाले त्यांनी अपघात झालेल्या वाहनाची पाहणी करून सदर वाहने सोनई पोलीस स्टेशन येथे घेऊन गेले असता त्या ठिकाणी ठाणे अंमलदार म्हणून ड्युटीवर असलेले सहाय्यक फौजदार आर आर लबडे नाईट ड्युटीला कार्यरत होते, मात्र लबडे हे ड्युटीवर असताना दारू पिऊन तर्र होते नाईट ड्युटीवर असताना सोनई पोलीस ठाण्याचे स.पो.नी. विजय माळी यांच्या केबिनमध्ये आर आर लबडे दारूच्या नशेत झोपलेले आढळून आले .त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला त्यांना आम्ही उठवल्याचा राग आला व त्यांनी आम्हाला सांगितले की तुम्ही फिर्याद देण्यासाठी उद्या सकाळी या मी तुमची फिर्याद आता घेऊ शकत नाही. आम्हाला उर्मट भाषा वापरून तुम्हाला काय वाकडे करायचे ते करा आणि कोणाला फोन करायाचा असेल तर करा. या वेळी चार महिला आर.आर.लबडे यांना विनवणी करत होत्या की आमची फिर्याद घ्या.मात्र हे महाशय काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते त्यांनी या महिलांना अर्वाच्च भाषा वापरून अपमानित केले सदर घटना ही दिनांक १६ रोजी रात्री बारा वाजल्यापासून ते पहाटे चार वाजेपर्यंत हा प्रकार सुरू होता. हे सर्व सी सी टीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाले असून फुटेज तपासल्यास आशा नशेबाज लबडे यांच्या करामती दिसून येतील असे सामाजिक कार्यकर्ते मोहन शेगर यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांना दिलेला निवेदनात म्हटले आहे. लबडे यांच्या बद्दल अनेक तक्रारी असून याची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी शेगऱ यांनी केली आहे.
कायद्याचे रक्षकच झाले भक्षक तर
सर्वसामान्य जनतेने न्याय माघायचा कोणाकडे अशा नशेबाज पोलीस अधिकाऱ्यामुळे चांगल्या व कर्तव्य दक्ष पोलीस अधिकाऱ्याची बदनामी होत आहे अशा घटनांना कुठेतरी आळा बसावा.यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित नशेबाज कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचे आवश्यकता आहे
सामाजिक कार्यकर्ता काशिनाथ चौगुले घोडेगाव