shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पत्रकारितेसह सामाजिक क्षेत्रात परोपकारी व्यक्तीमत्व असलेले पत्रकार विष्णूभाऊ राऊत

अमरावती जिल्ह्याच्या जरूड येथील मनमिळावू, सुस्वभावी, सर्व समावेशक, जात-धर्म-पंथ पक्ष लिंग कुठल्याही प्रकारचा भेदाभेद न करणारा, शिव फुले शाहू-आंबेडकरी विचारधारेचा खंदा पुरस्कर्ता आणि निःपक्षपाती पत्रकारिता करणारा एक प्रामाणिक व सच्चा वार्ताहर म्हणजे आमचे मित्र विष्णू राऊत होय.
विष्णू भाऊ अगदी तरुण वयापासूनच सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय चळवळीमध्ये सक्रिय राहिलेले परोपकारी व्यक्तिमत्व आहे. विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी विविध चळवळी केल्या, गावातील नागरिकांच्या समस्या शासकीय व प्रशासकीय स्तरावर सोडविण्यासाठी वेळप्रसंगी अधिकाऱ्यांशी व पदाधिकाऱ्यांशी घनघोर चर्चा करून जनसामान्याचे प्रश्न अगदी पोट तिडके ने मांडून सोडविण्याचा सतत प्रयत्न विष्णू राऊत यांनी केलेला आहे
९० च्या दशकामध्ये स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी व कार्यप्रणालीशी प्रभावित होऊन विष्णू भाऊ यांनी शिवसेना पक्ष जवळ केला आणि शिवसेना पक्षाची विचारधारा आपल्या तरुण सवंगड्यांना सांगून अनेक शिवसैनिक त्यांनी जोडलेत, त्यांनी राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक जास्त महत्त्व दिले, छत्रपती शिवरायांची जयंती अगदी मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदा जरूड परिसरामध्ये विष्णू भाऊ राऊत यांनी सुरू केली ज्याचा साक्षीदार मी स्वतः आहे १९९५ साली जरूड
येथील गुजरी बाजारामध्ये भव्य शिवजयंतीचा कार्यक्रम विष्णूजी आणि त्यांचे सवंगडी शिवसैनिक यांनी साजरा केला, ज्यामध्ये मी प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित होतो. त्यानंतर ग्राहक चळवळ, अंधश्रद्धा निर्मूलन असे अनेक कार्यक्रम व उपक्रम विष्णू भाऊ राऊत यांनी राबविलेत, वार्ताहरशिप करत असताना आपल्यावर पक्षपातीपणाचा आरोप लागणार नाही याची त्यांनी दक्षता घेतली, आपल्या जीवननिर्वाहासाठी त्यांनी बस स्टैंडवर एक छोटेसे जीवनावश्यक वस्तूंचे दुकान थाटले त्या ठिकाणी वर्तमानपत्रांची विक्री आणि येणाऱ्या जाणाऱ्यांच्या भेटीगाठी व चर्चा त्यांनी सुरु केल्या, त्यांनी आपल्या स्वतःचं एक जनसंपर्क कार्यालयात त्याठिकाणी जणू सुरू केलं, मी सुरुवातीलाच हजारात शत्रू वार्ताहर असं म्हटलेलं आहे, त्याचं कारणही तसंच आहे विष्णू भाऊंच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये सर्वच पक्षाचे, सर्वच विचारधारेचे, सर्वच क्षेत्रातील गणमान्य पासून तर सामान्यांपर्यंत माणसं सकाळला आणि सायंकाळला एकत्रित बसतात आणि माणूस समाज गाव राज्य व राष्ट्रीय पातळीच्या चर्चा त्या ठिकाणी घडवून येतात, सर्वांचे मैत्री राहावी यासाठी त्यांनी जवळपास १०० तरुणांचा एक अभिनव मित्र परिवार म्हणून संच किंवा मंडळ त्यांनी स्थापन केलं, त्यांच्या जीवनकार्यातील एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ते आपल्या मित्र मंडळातील सर्वच सदस्यांचा मोठ्या हिरीरीने व उत्साहाने वाढदिवस साजरा करतात, तरुण मुलांना बोलता यावं, भाषण देता यावं म्हणून त्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात किमान २० ते २५ लोकांना एक एक दोन दोन मिनिटं का असेना बोलायला लावतात म्हणजे बोलणारा माणूस चळवळ चळवळीत सहभागी होणारा माणूस समाजकार्यात धडपडीने भाग घेणारा माणूस घडावा ही त्यांची महत्त्वाकांक्षी योजना आहे त्यांचा १८ मार्च हा त्यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या शुभ प्रसंगावर नेत्यांना हार्दिक शुभेच्छा देतो त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना उत्तम आयुरारोग्य लाभो व दीर्घ आयुष्य लाभो ही सदिच्छा व्यक्त करतो आणि या अजातशत्रूला त्याच्या कार्यामध्ये सदैव यश मिळत राहो अशी देखील सदिच्छा व्यक्त करतो.

*संकलन - सी.टी. पठाण
सेवानिवृत्त उपमुख्याध्यापक जरुड
लेख प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर 9561174111
close