नगर (प्रतिनिधी)- वाळकी येथील शंकर वजन चव्हाण यांना व कुटुंबातील व्यक्तींना बळजबरी मारहाण करून मोक्यातील सराईत गुन्हेगार व त्यांची टोळी हे विनाकारण खोट्या केसेस दाखल करून खंडणी मागत असल्याच्या निषेधार्थ पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.पुढे निवेदनात म्हटले आहे की, ८ मार्च २०२५ रोजी संध्याकाळी ५ ते ६ च्या दरम्यान घरात येऊन हल्ला केला त्यात मुलगा विवेक चव्हाण व पत्नी व मला मारहाण केली तरी त्यांच्यावर लवकरात लवकर गुन्हा दाखल करण्यात यावा व या संपूर्ण प्रकरणात कुठल्याही दुसऱ्या व्यक्तीचा संबंध नसून सदरील आरोपी ऊरुस व ज्ञानदेव व त्याचे सर्व भाऊ हे गुन्हेगार असून त्यांनी अनेक वेळा बाहेरगावातील लोकांना बोलावून सोने देतो म्हणून पैसे हिसकावून मारहाण केलेले आहे. तसेच ठाणे येथील एक इसम रामायण याने ताम्हणे यांच्याकडून १५ लाख रुपये देऊन मारहाण केली होती. त्यात उरुस व त्याचे सर्व घरचे लोक आरोपी आहेत त्यांची केसची भरपाई करण्यासाठी पैशाची जमवाजमव करीत असून सर्व पारधी लोकांना उसनवार पैसे मागू लागले त्यात माझ्याबरोबर उरूस यांचा वाद झाला सदरचा वाद भेटल्यानंतर पैसे न घेता वाद मिटवला म्हणून उरूस व त्याचे लोकांचे भांडने झाली त्यात त्यांचे डोळ्याला मार लागला त्यांनी सर्वांनी विचार करून माझे व माझ्या मुलाचे तसेच या वादात हजर नसणारा व त्याचा संबंध नसताना राम चव्हाण व त्याचे भाऊ यांच्याकडून पैशाची मागणी केली व त्यांनां गुंतवायच्या हेतूने राम चव्हाण याचे नाव घेण्याची ही जुनी पद्धत असल्याचे शकर चव्हान म्हंटले असून लवकरात लवकर आरोपींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.