भोर ,पुणे ऐतिहासिक पुणे जिल्ह्यातील नायगाव भोर या ठिकाणी सुसज्ज असलेल्या नवसह्याद्री शैक्षणिक संकुलात जागतिक महिला दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील पहिल्या भारतीय महिला कुस्तीपटू व प्रशिक्षक अंजली देवकर वल्लाकट्टी यांनी विद्यार्थिनींना स्वयंसंरक्षणाचे प्रात्यक्षिके सादर केली. अन्याय व अत्याचाराच्या गोष्टी स्व संरक्षणाच्या माध्यमातून तुम्ही दूर करू शकतात असे प्रतिपादन शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अंजली देवकर यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री .पोपटराव सुके ,संस्थेच्या उपाध्यक्ष सौ. सायली सुके,ग्रुप डायरेक्टर सागर सुके ,एमबीए संचालक डॉ.तानाजी दबडे ,फार्मसी प्राचार्य डॉ. किशोर ओतारी, इंजिनिअरिंग प्राचार्य डॉ. अमोल लोखंडे, पॉलिटेक्निक प्राचार्य प्रा.पंकज भोकरे सातारा जिल्ह्यातील खुटाव तालुक्यातील उमेद या सामाजिक चळवळीच्या प्रणेत्या सौ. विद्याताई घाडगे व कार्यक्रम प्रमुख डॉ. सुहास पाखरे आदी मान्यवर उपस्थित होते
विद्यार्थिनींनी स्वतःची संरक्षण स्वतः करावे. आपल्याजवळ आपला आवाज, नखे हे संरक्षणाचे हत्यारे आहेत. आपला आवाज हे आपले सर्वात मोठे हत्यार आहे. उपलब्ध साहित्याचा वापर स्वतःच्या संरक्षणासाठी कसा करावा याचे मार्गदर्शन देवकर यांनी केले. याप्रसंगी स्वयं संरक्षणाची काही प्रात्यक्षिके व लाठी काठी चे प्रात्यक्षिक साधन करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यां मध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत होणार आहे असे वक्तव्य संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. सायली सुके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ. स्वाती खुटवड, सौ. राजश्री सावंत, सौ.शितल राठोड, सौ. कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अस्मिता हेंद्रे व सौ. दिपाली जाधव तसेच आभार सौ.सीमा जाधव यांनी केले.