" चला हिवतापाला संपवू या ; पुन्हा योगदान द्या ; पुनर्विचार करा ; पुन्हा सक्रिय व्हा "
या घोषवाक्याला अनुसरून आपला दवाखाना तीवसा येथे येथे जागतिक हिवताप दिन मा. अधीक्षक डॉ. माने,मा.वैद्यकीय अधिकारी डॉ. जोशी मॅडम यांच्या मार्गदर्शनात प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी आरोग्य सेवक श्री साळुंखे व आरोग्य सेवक श्री मुदगल, तसेच हत्तीरोग कर्मचारी, सर्व आशा स्वयंसेविका, आशा गटप्रवर्तिका उपस्थित होत्या.
यावर्षीचे घोष वाक्यामध्येच हिवताप या आजाराला संपविण्याकरीता "निरंतर सामूहिक प्रयत्नांची गरज" असल्याची बाब अधोरेखीत केली आहे.
हिवताप व अन्य किटकजन्य आजार थांबवण्याकरीता शासकीय आरोग्य यंत्रणे सोबतच जनतेच्या सहयोगातून नियंत्रण करता येईल.
शाळेतील शिक्षक व महत्त्वाचे म्हणजे गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते