shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आरोग्य उपकेंद्र कोकळगाव येथे जागतिक हिवताप दिन साजरा

अमरावती:- आयुष्मान आरोग्य मंदिर उपकेंद्र कोकळगाव येथे जागतिक हिवताप दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. 
जागतिक हिवताप दिन " 25 एप्रिल 2025 या वर्षाचे घोषवाक्य...


 _“ चला हिवतापाला संपवू या : पुन्हा योगदान द्या, पुनर्विचार करा, पुन्हा सक्रिय व्हा "_
         यामध्ये सर्व नागरिकांना हिवताप व किटकजन्य आजाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले व गप्पी मासे लारव्हा कसे खातात व गप्पी माश्यांची उपयुक्तता व डासांची पैदास कशी रोखतात याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. हिवताप,डेंग्यू, चिकन गुनिया,हत्तीरोग या आजाराचे डास घरघुती पाणी, घरघुती भांडी, टाकी, रांजण, माठ,जुनाट टायर,फुटके डब्बे, फुटलेल्या बादल्या मध्ये साचलेल्या पाण्यात,नालीत हे डास अंडी देतात व डास तयार होऊन हे आजार होण्याची शक्यता आहे त्यासाठी सर्व नागरिकांनी आपल्या घरी व परिसरात स्वच्छता ठेवून खालील उपाययोजना कराव्यात असे आरोग्य शिक्षण देण्यात आले.

१) ताप आल्यास व ताप कमी होत नसल्यास रुग्णाचे अंग ओल्या कापडाने पुसून काढावे तसेच रुग्णाला ताबडतोब जवळच्या सरकारी उपकेंद्र , प्रा. आ. केंद्र , ग्रामीण रुग्णालय, येथील डॉक्टरांकडून उपचार करुन घ्यावा.
२) आठवड्यातील एक दिवस कोरडा पाळणे, म्हणजेच घरगुती पाणी साठवण्याची भांडी, हौद, माठ, टँक व रांजण इत्यादी सहाव्या दिवशी घासुन स्वच्छ कोरडे करावे व पुर्ण सुकल्यानंतर पाणी भरावे. पाण्याची कमतरता असल्यास पाणी जाड कापडाने गाळून घ्यावे. व आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा.
३) घराच्या छतावर किंवा आवारात पडुन असलेल्या निकामी वस्तु जसे टायर, शिश्या, टिनडब्बे यांना नष्ट करावे किंवा विल्हेवाट लावावी.
४) प्रत्येकांनी आपआपल्या घरासमोरील नाल्या स्वच्छ ठेवाव्या. पाणी वाहते ठेवावे.
५) घराच्या परिसरात डबके किंवा गटारे तयार होऊ देवु नये. झाल्यास घरगुती उपाय म्हणुन पाणी साठलेल्या ठिकाणी गप्पी मासे सोडावे.
७) संडासच्या गॅस पाईपला पातळ कापड किंवा नायलॉनची पिशवी बांधावी.
८) डासापासून स्वरक्षणाकरीता मच्छरदाणीचा वापर करावा.
९) शक्य असल्यास दरवाजे व खिडक्यांना जाळ्या लावुन डासांपासून बचाव करावा.
१०) डासांपासून बचावासाठी संध्याकाळच्या वेळेस लांबलचक पुर्ण बाजु कपड्यांचा वापर करून परीधान करावे.
            सर्व नागरिकांनी उपरोक्त उपाययोजनांची अंमलबजावणी केल्यास डासोपत्तीस आळा घालणे व त्यापासून होणाऱ्या किटकजन्य रोगांपासून मुक्ती सहज शक्य आहे.
वरील बाबतीत नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. जागतिक हिवताप दिन मा.जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.संजय पवार, मा.तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रदीपकुमार जाधव व मदनसुरी प्रा.आ.केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.रोहिणी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला.       जागतिक हिवताप दिन साजरा करण्यासाठी डॉ.अभिजीत रूमणे, आरोग्य निरीक्षक श्री.अजय देशमाने, आरोग्य कर्मचारी श्री.राहुल भोसले, आरोग्यसेविका श्रीमती.सी.के.जाधव यांनी सहकार्य केले.
close