श्रीरामपूर / प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुक्यातील अशोकनगर फाटा परिसरातील ओम शिव गोरक्षनाथ मंदिर या ठिकाणी सदगुरु कुंभार काका यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली, यावेळी सकाळी विधीवत पूजन अभिषेक होम हवन दुपारी १२ वा वारकरी सांप्रदायिक भजन सेवा संपन्न झाली यानंतर महाआरती महाप्रसाद वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी संतोष भालेराव,नाना दळवी, गौरव पवार, सुनील पवार, श्याम उफाड, श्रीराम शिंदे, आप्पासाहेब मोरे, ग्रामपुरोहित वेदाचार्य रंगनाथ मेगदे, साजन भोंडगे, युवराज साळवे, दीपक पवार अनिल देवगिरे, नागेश सुगुर, पोपर परदेशी, हभप तुकाराम महाराज कदम तसेच श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार संतोष परदेशी, पो. कॉ. वसीम इनामदार, प्रविण कांबळे, गृहरक्षक दलाचे राजेन्द्र देसाई, चंद्रकात मोरकर, महेश भालके आदि यावेळी उपस्थित होते.
उफाड परिवाराच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी शिरसगांव भजनी मंडळ, गोरक्षनाथ मंडळ आदींनी सहकार्य केले. उपस्थित सर्व मान्यवरांचे अध्यक्ष श्री बाबासाहेब उफाड यांनी आभार मानले.
वृत्त विशेष सहयोग
पत्रकार राजेंद्र देसाई
वडाळा महादेव
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111