व्यंगचित्र, चित्रकला आणि सुलेखन क्षेत्रातील भरीव योगदानाची दखल; २५ मे रोजी बारामतीत पुरस्कार वितरण.
दैनिक ‘नवराष्ट्र’चे पत्रकार व मर्मभेदक साप्ताहिक व्यंगचित्रकार प्रा. शरद महाजन यांना त्यांच्या व्यंगचित्रकला, चित्रकला आणि सुलेखनकलेतील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘अक्षर गौरव पुरस्कार २०२५’ जाहीर झाला आहे.
हा पुरस्कार 'माझी शाळा माझा फळा' समूह आणि अँग्रीलव्हर डेव्हलपमेंट ट्रस्ट, शारदानगर, बारामती यांच्या वतीने देण्यात येतो. प्रा. महाजन यांनी शालेय विद्यार्थ्यांमध्ये कलागुणांची रुजवणूक व संवर्धन करण्यासाठी घेतलेली मेहनत आणि त्यांच्या सर्जनशील योगदानाची ही विशेष दखल घेत पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
हा राज्यस्तरीय पुरस्कार दिनांक २५ मे २०२५ रोजी बारामती येथे होणाऱ्या अक्षर संमेलनात मान्यवरांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे.
सरांना मन:पूर्वक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा!



