श्रीगोंदा / प्रतिनिधी:
मनात दुर्दम्य इच्छा शक्ती, जिद्द, चिकाटी आणि परिश्रम करण्याची तयारी असल्यास शिखर गाठता येते याचे ताजे उदाहरण म्हणजे गुंडेगाव येथील रुकसाना अशीर सय्यद हिची पुणे कारागृह पोलीसपदी निवड झाली आहे.
रुकसाना ही नगर तालुक्यातील गुंडेगाव या छोट्याश्या गावात राहणारी सर्व साधारण कुटुंबातील मुलगी आहे, तीचे वडील खेड्या-पाड्यात जाऊन कुल्फी विक्री चा व्यवसाय करतात तर मोठे चूलते शकील सय्यद आणि छोटे चूलते समीर सय्यद या दोन्ही चुलत्यांचे तीला वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.
दिड वर्षा पुर्वी रुकसाना चा इनामगांव येथील पिरजादे कुटुंबात विवाह झाला. पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या रुकसानाला पती आणि सासू - सासऱ्याऱ्यांनी पाठबळ दिले.
विशेष म्हणजे यापूर्वी झालेल्या पोलीस भरतीत काही गुणांनी तिची संधी हुकली होती. आहे. मात्र नुकत्याच झालेल्या कारागृह पोलीस परीक्षेत तिने यश संपादन करत पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.
तिची पुणे कारागृह येरवडा,पोलीस कर्मचारीपदी निवड झाली असली तरी स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी व्हायचे स्वप्न असल्याचे रुकसाना ने बोलून दाखवले आहे.
रुकसाना हिची पुणे कारागृह पोलीसपदी निवड झाल्या बद्दल गुंडेगाव व इनामगांव ग्रा.पं. सरपंच, उपसरपंच ग्रामस्थ आदींनी तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत अभिनंदन केले आहे.
*वृत्त विशेष सहयोग
पत्रकार राजु शेख - श्रीगोंदा
संपादक: श्रीगोंदा आवाज
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111