shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बावडा येथील प्रा. महादेव गुजर यांना राज्यस्तरीय ज्ञानज्योती पुरस्काराने केले सन्मानित.

बावडा येथील प्रा.  महादेव गुजर यांना राज्यस्तरीय ज्ञानज्योती  पुरस्काराने केले सन्मानित. 
 इंदापूर :- बावडा (ता. इंदापूर)  येथील श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील   प्राध्यापक महादेव गुजर यांना आविष्कार सामाजिक आणि शैक्षणिक फाउंडेशन भारत,शाखा कोल्हापूर महाराष्ट्रच्या वतीने  दि. 17 ऑगस्ट 2025 रोजी मौलाना अब्दुल कलाम आझाद मेमोरियल हॉल, कोरेगाव पार्क , पुणे येथे राज्यस्तरीय ज्ञानज्योती पुरस्कार-2025 देऊन सन्मानित करण्यात आले.

    यावेळी या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे  अतिरिक्त महासंचालक, यशदा, पुणे शेखर गायकवाड 
व कार्यक्रमाचे अध्यक्ष  ज्येष्ठ साहित्यिक, कोल्हापूर प्रा. किसनराव कुऱ्हाडे पाटील,
 तसेच मास्टर ट्रेनर यशदा पुणे
विवेक गुरव व ग्रामीण साहित्यिक बावडा डॉ. दादासाहेब कोळी, कार्यक्रमाचे मुख्य आयोजक,   संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष, आविष्कार सामाजिक आणि शैक्षणिक फाउंडेशन इंडिया शाखा कोल्हापूर संजय पवार
 जिल्हाध्यक्ष  प्रा.डॉ.  प्रकाश चौधरी पुणे,
  पुणे महासचिव विलास आंबेकर, पुणे शहराध्यक्ष श्रीकांत जगताप, पुणे शहर सेक्रेटरी,
प्रा.डॉ. संतोष खलाटे,  पुणे जिल्हा संघटक मनोज औंधकर  व  पुणे जिल्हा महिला संघटक सौ. संगीता शिरसाठ व इतर मान्यवर उपस्थित होते.

            या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.  प्रकाश चौधरी यांनी केले व सूत्रसंचालन प्रा. श्रीकांत जगताप यांनी केले  तर कार्यक्रमाचे आभार .डॉ.श्री. संतोष खलाटे  यांनी केले.
           प्रा.  महादेव गुजर  हे श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बावडा येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत असून त्यांनी सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या आणि करीत असलेल्या कार्याची  दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय ज्ञानज्योती पुरस्कार -2025 हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

             प्रा. महादेव गुजर यांनी यांनी माहिती तंत्रज्ञान, संगणक, डिजिटल कॅमेरा, मोबाईल, इंटरनेट, इत्यादी मायावी माध्यमाच्या पसाऱ्यात मर्यादशील होऊन काळाबरोबर वृतस्थपणे झोकून देऊन ते काम करीत असून विद्यार्थी, पालक व समाजाप्रती असलेली  तळमळ, सामाजिक निष्ठा आणि प्रेम यामुळेच त्यांनी समाजाच्या विविध क्षेत्रात वैविध्यपूर्ण काम केले आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांना कोल्हापूर जिल्हा शाखेच्या वतीने "राज्यस्तरीय ज्ञानज्योती पुरस्कार -2025"त्यांना देऊन गोरविण्यात आले.
       त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात काम करीत असताना वेगवेगळ्या समाजातील गरजवंत मुलामुलींना शिक्षण घेत असताना शिक्षणात येणाऱ्या अडचणी प्रती शैक्षणिक व आर्थिक मदत सामाजिक भावनेने करुन विद्यार्थ्यांना दिलासा आणि आत्मविश्वास मिळेल अशाच प्रकारचे कार्य केले आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत असताना विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून कार्यरत राहिले आहेत. उच्च माध्यमिक विभागात भौतिकशास्त्र या विषयाच्या अध्यापनाची जबाबदार यशस्वीपणे पार पाडत आहेत. त्यामुळे इयत्ता 12वी विज्ञान शाखेचा भौतिकशास्त्र या विषयाचा निकाल हा दरवर्षी सलग 24 वर्षे 100% आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेत भौतिकशास्त्र  या विषयात १०० पैकी १०० गुण मिळवणारे विद्यार्थी आहेत. त्यांच्या या मदत व प्रयत्नामुळे अनेकांना नवसंजीवनी मिळाली असून हा गौरव म्हणजे कृतज्ञता होय. शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थी व समाज उन्नतीसाठी प्रयोगशील असे काम केले आहे. समोर आलेल्या संकटांना कधीही न घाबरता संकटांना आव्हान म्हणून घेतले आणि पार करण्यासाठी प्रयत्नांची पराकष्टा केली. यश मिळवणे हेच डोक्यात ठेवले त्यामुळे या क्षेत्रात उतुंग असे कार्य केले आहे. त्याबद्दल त्यांना "राज्यस्तरीय ज्ञानज्योती पुरस्कार -2025" देऊन अविष्कार फाउंडेशनच्या वतीने मानपत्र, प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या या पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष व राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष,  हर्षवर्धन पाटील, संस्थेचे जेष्ठ संचालक,  उदयसिंह पाटील, युवा नेते   राजवर्धन पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष  मनोज पाटील, सचिव  किरण पाटील व सर्व संचालक मंडळ  आणि विद्यालयाचे प्राचार्य, श्री. डी. आर. घोगरे, उपमुख्याध्यापक,  हासे डी. व्ही. पर्यवेक्षक,व्यवहारे एस. आर. व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रा. महादेव गुजर यांचे अभिनंदन केले*.
close