नाभिक समाजाच्या वतीने आ.चंदुभाऊ यावलकर, माजी खासदार रामदास तडस व डॉ. निलेश बेलसरे यांचा सत्कार
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
वरुड (जि.अमरावती) येथील संत नगाजी महाराज समाज भवन याठिकाणी श्रावण मासाच्या निमित्ताने कढई व प्रसादाचे आयोजन मोठ्या भक्तिभावात संपन्न झाले.
या प्रसंगी नाभिक समाजाच्या वतीने वरुड- मोर्शी मतदारसंघाचे आमदार उमेश ऊर्फ चंदुभाऊ यावलकर, वर्धा मतदार संघाचे माजी खासदार रामदास तडस यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी प्रामुख्याने उपस्थित मध्ये नगरसेवक डॉ.निलेश बेलसरे यांना देखील गौरव चिन्ह देवून गौरविण्यात आले .
या वेळी मान्यवरांसोबतच नाभिक समाजातील अनेक महिला व पुरुष बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महिला नाभिक संघटनेच्या कार्यकर्त्या बहिणींनी आमदार उमेश यावलकर व माजी खासदार तडस यांना राखी बांधून पवित्र बंधु- भगिनीचे नाते दृढ केले.
सत्कारानंतर आमदार उमेश उर्फ चंदुभाऊ यावलकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले, “मी माझ्या बहिणींना प्रत्येक सुख- दुःखात मदत करीत असतो आणि करीत राहीन. समाजाचा विश्वास हेच माझे खरे बळ आहे असेही ते म्हणाले.
या सोहळ्यादरम्यान उपस्थित सर्व मान्यवरांनी नाभिक समाजाच्या एकत्रित कार्याची प्रशंसा केली. भाविक व समाज बांधवांनीही मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवत कार्यक्रमाला यशस्वीतेची परंपरा लाभली.
या वेळी नाभिक संघटनेचे अध्यक्ष रामकृष्णा शिरूळकर, युवा अध्यक्ष रितेश धानोरकर, पत्रकार प्रविण सावरकर, संत नगाजी महाराज चॅरिटेबल टूस्ट चे अध्यक्ष रमेश माथुरकर, रमेश आसोलकर, वासुदेव धानोरकर, सुधाकर धानोरकर, राजेश मिसळकर, विजय राऊत, दिपक पापडकर, शुभम साखरकर, मंगेश येवतकर, निलेश साखरकर, प्रविण ससनकर, नारायण द्रवेकर, गणेश सिरस्कर, उमेश शिराळकर, मनोज कावलकर, गुडू सुर्यवंशी, शैलेश जाधव, प्रविण पापडकर तसेच नाभिक महिला संघटनेच्या अध्यक्षा वर्षा तळखंडकर, सचिव निलम सावरकर, शोभा शिरूळकर, पुनम बाभुळकर, सौ. निभोरकर यांची उपस्थिती लाभली.
*वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार प्रविण सावरकर - वरुड
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111