श्रीरामपूर / प्रतिनिधी:
श्रीकृष्ण म्हणजे भारतीय संस्कृतीचे भक्ती आणि शक्तीचे आदर्श श्रद्धास्थान असून त्यांच्या जयंती सोहळ्यात श्रीकृष्णजयंती लेखन पुरस्काराने माझे जीवन अधिक धन्य झाले, असे गौरवोद्गार कवयित्री संगीता फासाटे/ कटारे यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर नेवासा रोडवरील महानुभाव आश्रम श्रीकृष्ण मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे आयोजित निबंध, कवितालेखन पुरस्काराचे वितरण करण्यात आले, त्याप्रसंगी 'श्रीकृष्ण भक्ती' कवितेला प्रथम पुरस्कार मिळाल्याबद्दल झालेल्या सत्कार सोहळ्यात कवयित्री संगीता फासाटे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य टी. ई. शेळके होते. प्रारंभी श्रीकृष्ण मंदिर प्रमुख महंत गोविंदराज दादा पंजाबी, महंत विशालराज दादा पंजाबी, तपस्विनी मनोरमाताई, तपस्विनी शकूताई आदिंच्या नियोजनाखाली श्रीकृष्ण मूर्तीचे पुष्पहार, गंधअक्षदा मंत्रोच्चाराने पाहुण्यांच्या हस्ते पूजन करण्यात आले, याप्रसंगी प्राचार्य तुळशीराम शेळके, वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक,अध्यक्ष व संयोजक डॉ. बाबुराव उपाध्ये, माजी मुख्याध्यापक भागवतराव मुठे पाटील, विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव व प्रमुख पाहुणे सुखदेव सुकळे, प्रकाश किरण प्रतिष्ठानचे संस्थापक,अध्यक्ष लेविन भोसले, भूमी फौऊंडेशनचे सदस्य,पत्रकार बाबासाहेब चेडे आदिंच्या उपस्थितीत श्रीकृष्ण मूर्तीची पूजा , दीपप्रज्वलन करण्यात आले. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी प्रास्ताविक केले तर भागवतराव मुठे पाटील यांनी स्वागत करून पाहुण्यांचे सत्कार केले. पुरस्कारप्राप्त कवयित्री संगीता फासाटे यांनी आपल्या भाषणातून श्रीकृष्ण मंदिर , कै. महंत ब्रीजलालदादा पंजाबी यांच्या आठवणी सांगून असे साहित्यिक, सामाजिक उपक्रम भक्तीचा आदर्श सांगणारे आहेत, सर्व बक्षीसप्राप्त स्पर्धकांचे त्यांनी अभिनंदन केले. मनस्वी गुरु गोविंदराज पंजाबी या छोट्या मुलींने श्रीकृष्ण कविता सादर केली. श्रीमती गीता शिवराम चोखंडे, कु. सोनी पंजाबी यांनी बक्षीसाबद्दल उपक्रमाचे कौतुक केले. सुखदेव सुकळे, लेविन भोसले यांनी सर्व स्पर्धकांचे कौतुक करून शाल, प्रमाणपत्र, पुस्तके, भेटवस्तू देऊन सत्कार केले.
*वाचन,लेखन आणि सद्गुण आचरण वाढावे - प्राचार्य टी.ई. शेळके*
आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य शेळके म्हणाले, डॉ. बाबुराव उपाध्ये हे १९७८ पासून साहित्य सेवेत कार्यरत आहेत. मी १९८२ साली श्रीरामपुरात आलो, तेव्हापासून त्यांच्या साहित्यिक उपक्रमात सहभागी आहे. श्रीकृष्ण मंदिरात ते कित्येक वर्षापासून असे उपक्रम घेतात, छोटी मुले आणि भक्तीवत्सल नागरिक यांना त्यांनी वाचन, लेखनाची गोडी लावली. कै. ब्रीजलालदादा पंजाबी यांचे या कार्याला मनापासून सहकार्य होते, त्यामुळेच स्व. ॲड्. रावसाहेब शिंदे हे आपल्या शैक्षणिक क्षेत्रातील प्राचार्य, प्राध्यापक, पालक, विद्यार्थ्यासह अशा उपक्रमात सहभागी होत असत. थोर लेखक शिवाजी सावंत यांच्यासारखे साहित्यिक येथे येत असत. हे श्रीकृष्ण मंदिर महानुभाव पंथभक्तीला आणि श्रीकृष्णनीतीला प्रतिष्ठा देत असल्याचे गौरवोद्गार काढले, पुरस्कार व बक्षीसपात्र सहभागींचे कौतुक केले.
याप्रसंगी महंत विशालराजदादा पंजाबी यांचा वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे शाल, पुस्तके, भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तपस्विनी चंद्रकलाताई, तपस्विनी शैलाताई, तपस्विनी स्वातीताई, तपस्विनी , कु. सोनी पंजाबी, विद्याताई, शौर्या विशालराज दादा पंजाबी आदिंनी कार्यक्रमाचे नियोजन केले, दहिहंडी श्रीकृष्ण जयंती उपक्रमाने श्रीकृष्ण जयंती संपन्न झाली. याप्रसंगी मुक्तारामदादा वाकचौरे,सौ. शालिनीताई शिंदे, वेदांत शिंदे, कार्तिक शिंदे आदीसह अनेक भक्तगण, पालक, विद्यार्थी, महानुभावीय उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी केले तर महंत विशालराजदादा पंजाबी यांनी आभार मानले.
*वृत्त विशेष म्हणजे
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111