श्रीरामपूर / प्रतिनिधी:
तालुक्यातील आजी माजी सैनिक संघर्ष समितीचा प्रथम वर्धापन दिन बेलापूर रोड येथील काळे लॉन येथे उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी समितीच्या पुढील प्रगती साठी सर्वधर्म समभाव,एकदुसऱ्याच्या सुख दुःखात सहभागी होणे बाबतीत, सद्ध्या अनेक पतसंस्था डबघाईस निघून अनेक सैनिकांची आर्थिक फसवणूक होत आहे अशा अनेक बातम्या पेपरला छापून येत आहेत त्यामुळे ठेव ठेवतांना नॅशनल बँकेत ठेवावी अशा प्रकारे अनेक विषयावर चर्चा करण्यात आली याप्रसंगी तालुक्यातील माजी सैनिकांना सातत्याने सेतूच्या माध्यमातून मोफत सेवा देणारे शिवतीर्थ सेतूचे सर्वेसर्वा प्रविण पैठणकर यांचा व संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष मेजर सुधाकर हरदास यांचा प्रकट दिनानिमित्त समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला.
समितीच्या वर्धापनदिनानिमित्त मेजर सुधाकर हरदास यांच्या वतीने स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी मेजर कृष्णा सरदार, बाळासाहेब बनकर , बाळासाहेब भागडे, विलास खर्डे, बाळासाहेब लोखंडे अशोक कायगुडे, चांगदेव धाकतोडे ,सुजित शेलार, राम पुजारी, राजेंद्र आढाव, पंढरीनाथ पुजारी भगीरथ पवार, अशोक साबळे, सुनील गवळी संजय बनकर सुनील भालेराव पार्वताबाई देसाई , वसंत देसाई,रामधन बिलवाल, शरद तांबे ,माधव ढवळे , कैलास गोरे ,गणेश सोडणार, सचिन पवार , रमेश माळी, ज्ञानदेव पुजारी , काळे कॅशियर स्टेट बँक इत्यादी माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*वृत्त विशेष सहयोग
मेजर कृष्णा सरदार - श्रीरामपूर
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111