शिर्डी प्रतिनिधी: ( संजय महाजन)
सामाजिक बातमी
शिर्डी शहरात गेल्या ४० वर्षापासून दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून धार्मिक संस्कार जोपासण्याचे कार्य करत आहे.
शिर्डी शहरात सर्वात शिस्तबद्ध व उंच दहीहंडी फोडण्याची मंडळाची परंपरा आहे. सालाबाद प्रमाणे या वर्षी दक्षिणमुखी मारुती मंदिरातून शिर्डी तील सामाजिक कार्यकर्ते दत्तूभाऊ कोते ( छोटे बापू), मा. मा. नगरसेवक गजानन शेर्वेकर, साई संस्थानचे मा. विश्वस्त सचिन तांबे, विश्व हिंदू परिषदेचे सुरेंद्र महाले, जगन्नाथ गोंदकर, बाळासाहेब थोरात, या प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते श्रीकृष्ण प्रतिमेचे पूजन करून सुरवात झाली.
पालखी मार्गवर उंच दहीहंड्या नियोजन व शिस्तबद्ध फोडण्यात आल्याने शिर्डी शहरात क्रांती युवक मंडळाचे कौतुक होत आहे. तसेच दहीहंडी उत्सव मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात स्थानिक महिला, व ग्रामस्थांची भर पावसात उपस्थिती लक्षणीय होती. तसेच बाल वेशातील नटून थटून आलेले श्रीकृष्ण व राधा सर्वांचे आकर्षण केंद्र बनले.
सर्व कार्यकर्ते व नागरिकांनी धार्मिक गाण्यावर बैंडच्या तालावर भर पावसात ठेका धरत आनंद लुटला.
हा उत्सव यशस्वी करण्यासाठी मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते बबलू वर्पे , आकाश वाडेकर, ललित शेळके, प्रसाद जाधव, अतिक पठाण, सचिन हरळे, रितेश भालेराव,
आदित्य वारूळे, संदेश रत्नपारखी, यांच्या सह अनेक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
निर्व्यसनी तरुणांसह शिर्डीत शिस्तबद्ध दहीहंडी उत्सव मंडळाच्या वतीने साजरा करण्यात येतो त्यामुळे शिर्डीतील स्थानिक महिला, आबालवृद्ध, नागरिक क्रांती युवक मंडळाच्या मिरवणुकीत सहभागी होतात.
शिर्डीतील सांस्कृतिक वातावरणाचे विकृतीकरण होणार नाही याची खबरदारी आम्ही घेत आहोत.
सचिन तांबे
मा. विश्वस्त श्री साईबाबा संस्थान }