शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन )
धार्मिक बातमी
न्याहळोद येथील पंचमुखी महादेव मंदिर परिसरात श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून भाविक दर्शनासाठी येत आहेत.
न्याहळोद येथील प्राचीन काळातील पंचमुखी महादेव मंदिर असून येथे भक्ती भावाने गावातील व बाहेरगावातील भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत असून नुकताच कीर्तन सप्ताह व भगवत कथेचे आयोजन करण्यात आले. कथेचे आयोजन विठ्ठल रुक्माई मंदिर ट्रस्टमार्फत करण्यात आले. भागवत कथेचे प्रवचन ह भ प स्वप्निल दाजी महाराज श्री राम रुंदावन यांच्या अमृतवाणीतून करण्यात आले. श्रावण महिन्यात नियमित कार्यक्रम होत असून सोमवारी त्याची सांगता होत असते व गावाला महाप्रसादाचे आयोजन देण्यात येत असते.