शिर्डी:- संजय महाजन
न्याहाळोद :-
न्याहाळोद येथे एक मुखी दत्त मंदिरात वार्ड नं.४ मध्ये शनिवार दिनांक १६/८/२०२५ रोजी गोपाळकाला उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.श्रावण महिन्यात सणांची रेलचेल असते.श्रीकृष्ण जन्मानंतर दुसऱ्या दिवशी गोपाळकाला हा सण साजरा केला जातो. श्रीकृष्णाच्या बाललीला सर्वांना आवडतात.शिक्यावरील दहीचे मडके फोडून आपल्या मित्रांसोबत दही,दूध,लोणी खायला श्रीकृष्णाला खूप आवडत असे.एकदा श्रीकृष्णांनी सांगितले की,सर्वांचे अन्नपदार्थ एकत्र करू या आणि काला करून खाऊ या. श्रीकृष्णाची कल्पना सर्वांना आवडली.सर्वांनी अन्नपदार्थ एकत्र केले व त्याचा काला केला तो काला अतिशय स्वादिष्ट झाला.गरीब श्रीमंत,जात-पात,धर्म हा भेद विसरून एकोप्याने सर्वांनी काल्याचा स्वाद घेतला.म्हणून हा सण आनंदाचे, एकतेचे व प्रेमाचे प्रतीक आहे.
वर्गणी रूपाने पैसे,गहू,तांदूळ, इतर सीधा आटा जमा करून वरणबट्टी,वांग्याची भाजी,शिरा असे स्वादिष्ट जेवण तयार केले सर्व जाती-धर्माच्या लोकांनी सहभोजनाचा आनंद लुटला.
या कार्यक्रमात आदिवासी विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मोतीलाल सोनवणे,ताराचंद शिरसाठ,सतीष पारधी,वसंत शिरसाठ,विष्णू धनगर,मल्हार लोहार,प्रवीण लोहार,आबा शिरसाठ,गोपाल लोहार,जयदीप वाकडे,हरीश ओतारी,अमोल सूर्यवंशी,रावसाहेब वाकडे,राजेंद्र चित्ते,ज्ञानेश्वर शिरसाठ, विनायक शिरसाठ,गोकुळ महाजन,राजू निळे,संदीप अमृतकर,सावकार शिरसाठ,सतीश शिरसाठ,अण्णा आखडमल,भगवान बोरसे,सोनू सावळे,भटू महाले,अभिमान बोरसे,भरत वाकडे,विठ्ठल लोहार, सागर पारधी,पिंटू शिरसाठ,विकी पारधी, बंटी माळी,विजय सावळे,प्रवीण नवसारे,प्रवीण निकम,सागर वाकडे,राज पारधी,महेश शिरसाठ,गणेश शिरसाठ,मनोहर चव्हाण,मेघराज धनगर,पप्पू शिरसाठ,रवींद्र साळुंखे,उत्तम शिरसाट,सुनील सूर्यवंशी,घनश्याम धनगर,साई अहिरे,पंकज शिरसाठ,मेहुल निकम, मयूर शिरसाठ, सागर सावळे,सुनील चव्हाण,विजय काकुळदे,विशाल मोरे,समाधान शिरसाठ,ओम ओतारी,वेदांत लोहार,आकाश शिरसाठ,साई शिरसाठ,दुर्गेश शिरसाठ,कमलेश शिरसाठ,प्रेम शिरसाठ,चेतन सैंदाणे,निंबा सैंदाणे, सचिन काकुळदे इत्यादींनी मेहनत करून कार्यक्रम यशस्वी केला.