श्रीरामपूर / प्रतिनिधी:
आजी माजी सैनिक संघर्ष समितीच्या वतीने देशाचा ७९ वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहाने शहरातील शहीद स्मारकाजवळ साजरा करण्यात आला, याप्रसंगी माजी सैनिक विधवा पत्नी श्रीमती पार्वताबाई देसाई यांच्या हस्ते शहीद स्मारकास रीथ (पुष्पचक्र) वाहून स्वातंत्र्य लढ्यात ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली अशा सर्व स्वातंत्र्यसैनिकांना व स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्या सैनिकांनी स्वातंत्र अबाधित राखण्यासाठी भारत देशाच्या सीमा रेषेच रक्षण करत असतांना प्राण अर्पण केले त्यांना सलामी दिली व संविधान उद्देशिकाचे वाचन करण्यात आले.
याप्रसंगी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मेजर सुधाकर हरदास व मेजर बाळासाहेब बनकर यांनी मनोगत व्यक्त केले. मनोगतात स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाची आठवण करून दिली, तिरंग्याचा सन्मान म्हणजे आपल्या देशाच्या सन्मानाचे रक्षण करणे होय, तिरंगा म्हणजे केवळ कापडाचा तुकडा नाही तर आपल्या इतिहासाची संस्कृतीची आणि ऐक्याची ओळख आहे हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळालेले नाही यासाठी स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान,त्याग आणि संघर्ष यांमुळेच आपण हा दिवस साजरा करत आहोत त्यामुळे तरुणाईने देशाच्या प्रगतीसाठी सतत योगदान दिले पाहिजे असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेजर कृष्णा सरदार यांनी केले तर आभार प्रदर्शन तालुका अध्यक्ष मेजर बाळासाहेब भागडे यांनी केले. कार्यक्रमास मेजर सुधाकर हरदास, अशोक कायगुडे, चांगदेव धाकतोडे, सुनील गवळी,बाळासाहेब बनकर, राजेंद्र आढाव, विलास खर्डे, बाळासाहेब लोखंडे, अशोक साबळे, सुनील गवळी, संजय बनकर,भगिरथ पवार , पंढरीनाथ पुजारी,राम पुजारी, काळे स्टेट बँकेचे कॅशियर शरद,तांबे सुजित शेलार, सुनील भालेराव, माधव ढवळे, कैलास गोरे, गणेश सोडणार, सचिन पवार, रमेश माळी, ज्ञानदेव पुजारी, वसंत देसाई ,रामधन बिलवाल, इत्यादी माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*वृत्त विशेष सहयोग
मेजर कृष्णा सरदार - श्रीरामपूर
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111