मखदूम सोसायटीतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
स्वातंत्र्य हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे आणि हा हक्क आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी बलिदान देऊन मिळवून दिला आहे.
या दिवशी आपण फक्त ध्वजवंदन करून थांबायचे नाही, तर देशासाठी कर्तव्यभावनेने जगण्याची शपथ घ्यायची आहे. शिक्षण हेच खरे शस्त्र आहे. आज मखदूम सोसायटीच्या वतीने मुलांना वह्या वाटप करून ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करण्याचा छोटासा प्रयत्न करण्यात आला आहे.
आजच्या पिढीने प्रामाणिकपणे शिक्षण घेतले, मेहनत केली, तर उद्याचा भारत नक्कीच उज्ज्वल होईल. आपण सर्वजण मिळून समाजात ऐक्य, प्रेम, बंधुता आणि प्रगतीचे आदर्श निर्माण करूया, असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेचे सल्लागार शरफुद्दीन शेख यांनी केले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त मखदूम सोसायटीच्या वतीने केडगाव येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.
या वेळी अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेचे सल्लागार शरफुद्दीन सर, सचिव आबीद दूल्हे खान, शिक्षिका आसमा बाजी, आयशा सुलताना आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमासाठी प्रसिद्ध कवयित्री डाॅ. कमर सुरुर, शरफुद्दीन शेख, शफी हज टूर्स अँड ट्रॅव्हल्स, राजकुमार गुरुनानी, डाॅ.दमन काशीद, युनुसभाई तांबटकर, वसंत पारधे, तन्नु महाराज, सुनील भंडारी, दिनेश मंजरतकर आदींचे सहकार्य लाभले.
या वेळी आबीद खान यांनी विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचे संस्कार जोपासण्यासाठी मार्गदर्शन केले.
सुत्रसंचालन आसमा बाजी यांनी केले. आभार आयेशा सुलताना यांनी मानले.
*वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान - अ.नगर
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111