*तक्रारदार वैभव शिंदे यांचे वतीने शिर्डी येथील ॲड. अमोल अजय पवार यांनी उच्चन्यायालयात बाजू मांडली
शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
सामाजिक बातमी
उक्कडगाव येथील श्री .रेणुका देवी मंदिर ट्रस्टचे अपहार व धर्मादाय उप – आयुक्त कार्यालयाच्या दस्ताच्या बनावटीकरण करणाऱ्या आरोपींचा जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला.
कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव येथील श्री रेणुका देवी मंदिराच्या ट्रस्टच्या पैश्यांचा ,सोन्या-चांदीच्या वस्तू व इतर मालमत्तेचा अपहार करून धर्मादाय उप आयुक्त कार्यालयातील परिशिष्ट 1 चे बनावटीकरण दस्तऐवज केल्याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा रजि. क्र. ०२४१/२०२४ हा दाखल झाला होता.
सदर गुन्ह्यातील आरोपी १) निवृत्ती रंगनाथ शिंदे, २) अशोक गंगाराम शिंदे, ३) लुखाजी सावळेराम शिंदे, ४) सोपान कारभारी शिंदे, ५) बाळासाहेब शंकर शिंदे, ६) नंदू अशोक शिंदे, ७) देविदास लुखाजी शिंदे, ८) बाळासाहेब कारभारी शिंदे, ९) प्रकाश लक्ष्मण शिंदे, १०) विजय बबन शिंदे, ११) शिवाजी आण्णासाहेब लावरे यांनी अटकपूर्व जामीन अर्ज कोपरगाव येथील मा. अतिरिक्त सत्र न्यायालयात दाखल केला होता.
सदरचा जामीन अर्ज मा. सत्र न्यायालयाने फेटाळून लावला होता त्यानंतर आरोपींनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती तेथेही त्यांचा अटकपूर्व जामीन नामंजूर करण्यात आलेला आहे आणि गुन्ह्याची गंभीरता बघता गुन्ह्याचा कसून आणि योग्य तपास होणे गरजेचे असल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने आदेशात नोंदवून आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला आहे.
तक्रारदार वैभव शिंदे यांचे वतीने शिर्डी येथील ॲड. अमोल अजय पवार यांनी उच्च न्यायालयात बाजू मांडली