भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमीला 'ऋषीपंचमी' हा सण साजरा केला जातो. या दिवशी सप्तऋषी – कश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नि आणि वशिष्ठ – यांचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाते. हा दिवस विशेषतः स्त्रियांसाठी महत्त्वाचा मानला जातो.
हिंदू धर्मात मासिक पाळीच्या काळात स्त्रियांसाठी काही नियम आणि बंधने आहेत. या काळात पवित्रतेकडे विशेष लक्ष दिले जाते. जर मासिक पाळीच्या काळात अज्ञानत: किंवा चुकून नियमभंग झाला असेल, तर त्या दोषापासून मुक्त होण्यासाठी स्त्रिया ऋषीपंचमीचे व्रत करतात.
या दिवशी स्त्रिया नांगरलेली जमीन किंवा पेरलेले धान्य खात नाहीत. मासिक पाळी संपल्यानंतर त्या शुद्ध होऊन ऋषीपंचमीचे व्रत करतात आणि सप्तऋषींची पूजा करून क्षमा मागतात. या व्रतामुळे त्या शारीरिक व आध्यात्मिक शुद्धतेकडे वाटचाल करतात, असे मानले जाते.
हिंदू धर्मात पवित्रता अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे ऋषीपंचमीचा सण हा श्रद्धा, शुद्धता आणि आत्मशुद्धी यांचे प्रतीक आहे.
संकलन : अशोककाका कुलकर्णी