प्रा.राजलक्ष्मी शंकरराव रणसिंग लाईफ सायन्स विषयात सेट, नेट जीआरएफ परीक्षा उत्तीर्ण
इंदापूर :इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब ता इंदापूर येथील विज्ञान विभागातील प्रा. राजलक्ष्मी शंकरराव रणसिंग यांनी लाईफ सायन्स या विषयात सेट, नेट, जीआरएफ देशात १०२ क्रमांक रॅंक ने परीक्षा उत्तीर्ण केली.या दोन्हीही परीक्षा त्यांनी दुसऱ्याच प्रयत्नात पास केल्या.प्रा राजलक्ष्मी रणसिंग यांनी परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्था सचिव विरसिंह रणसिंग यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.यावेळी महाविद्यालय प्राचार्य डॉ अशोक काळंगे ,उपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळीग ,प्राध्यापक डॉ विजय केसकर ,डॉ प्रशांत शिंदे ,डॉ विलास बुवा ,डॉ रामचंद्र पाखरे,डॉ सुहास भैऱट ,प्राध्यापक राजेंद्रकुमार डांगे ,प्रा. ज्योत्स्ना गायकवाड,ग्रंथपाल विनायक शिंदे इ मान्यवर व प्राध्यपकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी प्रा.राजलक्ष्मी रणसिंग यांनी सेट ,नेट ,जीआरएफ परीक्षेदरम्यान वेळेचे योग्य व्यवस्थापन व शिस्त या माध्यमातून यश निश्चित संपादन होत असल्याचे सांगितले.त्यांनी या सर्व यशाचे श्रेय कुटुंबीयांना व गुरुजनांना दिले. संस्था सचिव विरसिंह रणसिंग यांनी संस्थेतील यशस्वी घटकांना नेहमी सहकार्य साथ देत असल्याचे सांगत प्रत्येक यशस्वी प्राध्यापक ,कर्मचारी व विद्यार्थी यांना प्राप्त झालेला सन्मान हा संस्थेचा नावलौकिक वाढवित असतो.यश संपादित व्यक्तीचा सन्मान संस्थाच्या वतीने करण्यात येतो. त्यांच्या पाठीशी संस्था खंबीरपणे उभी राहत असून चांगल्या उपक्रमासाठी व कार्यासाठी संस्था साथ देत असल्याचे सांगितले.प्राचार्य डॉ अशोक काळंगे यांनी विज्ञान शाखेतील प्राध्यापकाने नेट सेट जीआरएफ परीक्षा उत्तीर्ण होण्यास अवघड बाब असूनही राजलक्ष्मी रणसिंग यांनी यश मिळविले याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. उपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळीग यांनी राजलक्ष्मी रणसिंग यांना शुभेच्छा देत भेटवस्तू प्रदान केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा सोनाली चव्हाण व आभार प्रा.सुमेधा रणसिंग यांनी व्यक्त केले.प्रा राजलक्ष्मी रणसिंग परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे ,संस्था अध्यक्ष आनंदी रणसिंग ,उपाध्यक्ष प्रकाश कदम ,विश्वस्त शिवाजीराव रणवरे ,विश्वस्त शंकरराव रणसिंग,विश्वस्त कुलदीप हेगडे ,विश्वस्त विरबाला पाटील,विश्वस्त राही रणसिंग यांनी अभिनंदन केले.