श्रीरामपूर / प्रतिनिधी:
राष्ट्रीय अंधत्व निर्मूलन कार्यक्रमांतर्गत समता फाउंडेशन, एच.व्ही.देसाई नेत्र रुग्णालय पुणे आणि अलनूर आय केअर व मखदूम सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने नि:शुल्क नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे तन्वीर चष्मावाला यांनी सांगितले.
रविवार दि. १९ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत हे शिबिर अहिल्यानगर (अहमदनगर) शहरातील मुकुंनगर येथील अलनूर आय केअर, बडी मरियम मस्जिद जवळ याठिकाणी होणार आहे. शिबिरात पात्र रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करून त्यांना योग्य ते सल्ला दिला जाणार असून, मोतीबिंदू असलेल्या रुग्णांची शस्त्रक्रिया एच.व्ही.देसाई नेत्र रुग्णालय पुणे येथे पूर्णपणे नि:शुल्क केली जाणार आहे. तसेच शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना ने-आण सुविधा व राहण्याची व्यवस्था देखील नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
शिबिरात सहभागी होणाऱ्या रुग्णांनी आपले आधारकार्ड व रेशनकार्ड सोबत आणण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या शिबिरामुळे परिसरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व नेत्ररोगांनी त्रस्त रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून, समाजात आरोग्य जागरुकतेचा संदेशही पोहोचेल, असा विश्वास समता फाऊंडेशन आणि मखदूम सोसायटीने व्यक्त केला आहे. अधिक माहिती साठी व नाव नोंदणीसाठी 097664 40632 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन तन्वीर चष्मावाला यांनी केले आहे.
वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान,अ .नगर
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111