नगर - मनमाड महामार्गाच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष - ऍड.रामनाथ सदाफळ
अजीजभाई शेख / राहाता
दोन दिवसांपूर्वी नगर - मनमाड महामार्गावरील गतिरोधक वरील वेगाने धावणारी वाहने याबाबतचा प्रश्न काही वृत्तवाहिनींव्दारे मांडण्यात आला होता. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रणजीत बोठे पाटील,ऍड.रामनाथ सदाफळ पाटील यांनी संबंधित प्रश्नावर छेडले असता त्यांनी सांगितले की, नागरिकांमधून मोठ्या प्रमाणात नगर - मनमाड महामार्गावर शहरी भागात गतिरोधक टाकण्याबाबत मागणी करण्यात आली होती.
राहाता शहरातील या महामार्गावर पी.जे.एस. एस.स्कूल, प्रीतीसुधाजी इंग्लिश मीडियम स्कूल या शाळा असल्याने या ठिकाणी विद्यार्थी आणी नागरीकांची नेहमीच मोठी वर्दळ असते करीता या ठिकाणी गतिरोधक टाकणे अत्यंत महत्त्वाचे आहे.मात्र नगर मनमाड महामार्गाच्या प्रश्नावर प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचे यावेळी ऍड.रामनाथ सदाफळ पाटील यांनी खंत व्यक्त केली.
केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री यांच्या दौरा प्रसंगी प्रोटोकॉल नुसार या महामार्गावरील ठिकठिकाणचे गतिरोधक काढण्यात आले होते.परंतु सदरील गतिरोधक काढल्याने वाहने भरधाव वेगात धावत असल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे, शाळकरी विद्यार्थी अबाल वृद्ध नागरिक, दिव्यांग, अपंग, दुर्घर आजाराने ग्रस्त रुग्ण व नागरिकांना रस्ता ओलांडणे मोठे कठीण झालेले आहे.
या कारणामुळे सामाजिक हित लक्षात घेता राहाता सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे अभियंता यांना संबंधित बाबी निवेदन देऊन नगर - मनमाड महामार्गावर शहर हद्दीत त्वरित गतिरोधक टाकण्याची मागणी करण्यात आली आहे.
कारण या महामार्गावर किरकोळ स्वरूपाचे अनेक अपघात हे नित्याचेच झाले आहे, तथा भविष्यात मोठे अपघात घडण्याची देखील दाट शक्यता असल्याने शहरातील या महामार्गावर शाळा, दवाखाने, चौक अशा महत्त्वाच्या ठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे रणजित बोठे, सामाजिक कार्येकर्ते ऍड. रामनाथ सदाफळ, अभिजित बोठे, जाईदभाई दारुवाले, बाळासाहेब गुळवे, निलेश डांगे, प्रशांत गायकवाड आदींनी निवेदन देऊन संबंधित ठिकाणी तात्काळ गतिरोधक बसवावे अन्यथा उग्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही देण्यात आला आहे.
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111