वडार समाजाचे भाग्यविधाते औसा मतदारसंघाचे आमदार मा. अभिमन्यूजी पवार साहेब यांच्या आशीर्वादाने वडार समाजाला मिळालेलं पैलवान कैं मारुती चव्हाण आर्थिक विकास महामंडळ आणि शिवाजी चव्हाण यांच्या सहकार्याने वडार समाजासाठी पैलवान मारुती चव्हाण आर्थिक विकास महामंडळ तर्फे स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू झाला आहे.
याच अंतर्गत औसा तालुक्यातील बालाजी कलाप्पा दंडगुले व कार्तिक यल्लप्पा दंडगुले या तरुणांना महामंडळाकडून ₹10 लाखांचे बिनव्याजी कर्ज मंजूर करण्यात आले. या रकमेचा उपयोग करून कार्तिक दंडगुले यांनी नवीन ट्रॅक्टर खरेदी केला असून, या ट्रॅक्टरचे पूजन मा. आमदार अभिमन्यूजी पवार साहेब यांच्या शुभहस्ते पार पडले. 🚜✨
महाराष्ट्रातील तमाम वडार समाजाच्या वतीने वडार समाजाचे भाग्यविधाते औसा तालुक्याचे मा.आमदार अभिमन्युजी पवार साहेबांचे खूप खूप धन्यवाद
या यशस्वी उपक्रमात शिवाजी चव्हाण यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून, त्यांनी औसा तालुक्यातील तरुणांना प्रोत्साहन देत सांगितले
“औसातील युवकांनी उद्योगधंद्यांत उतरावे, स्वतःच्या पायावर उभे राहावे. आमदार साहेबांच्या आशीर्वादाने आणि समाजाच्या पाठबळाने कोणतीही गोष्ट अशक्य नाही.”
हा उपक्रम औसा तालुक्यातील युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असून, ग्रामीण भागात स्वावलंबन आणि आर्थिक उन्नतीसाठी दिशा देणारा ठरत आहे. 🌾

