लाखेवाडी गावात सद्गुरु कृषि महाविद्यालयाच्या कृषीकन्यांचे आगमन
इंदापूर:महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत सद्गुरु कृषि महाविद्यालय, मिरजगाव ता. कर्जत, जि. अहमदनगर च्या कृषीकन्या पोटे साक्षी, शिंदे साक्षी, शिरसाठ राजलक्ष्मी, वाघ गायत्री, बगाडे राजश्री यांचे ग्रामीण कृषि कार्यानुभव आणि कृषि औद्योगिक संलग्नता उपक्रम २०२५-२६ च्या अभ्यास दौऱ्यानिमित्ताने इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी या गावामध्ये आगमन झाले. लाखेवाडी येथील सरपंच व ग्रामस्थांनी कृषिदूतांचे स्वागत केले. कृषिदूतांच्या आगमनावेळी गावचे सरपंच सौ.ढोले चित्रलेखा, उपसरपंच खराडे शंकर, ग्रामसेवक गणेश खर्माटे, इतर ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामीण कृषि कार्यानुभव हा कार्यक्रम कृषि पदवीच्या चतुर्थ वर्षाच्या अभ्यासक्रमाचा एक महत्त्वाचा भाग असून, यात विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवन, सामाजिक व आर्थिक परिस्थिती आणि शेतीशी संबंधित समस्यांची प्रत्यक्ष माहिती व्हावी यासाठी या कार्यक्रमांतर्गत पुढील तीन महिने ह्या विद्यार्थिनी गावामध्ये मुक्कामी राहून शेतकऱ्यांसाठी विविध कृषीविषयक कार्यक्रम राबवणार आहेत. या अभ्यासदौऱ्यादरम्यान कृषीकन्या शेतकऱ्यांना शेती विषयक शास्त्रीय माहिती, हंगामा प्रमाणे पीक पद्धती, रासायनिक खतांचा योग्य वापर, कीटकनाशके फवारताना घ्यायची काळजी, कीटकनाशक आणि सेंद्रिय शेती, आधुनिक कृषी तंत्रज्ञान याबद्दल माहिती देतील तसेच माती परीक्षण, पाणी व्यवस्थापन, कीडरोग पिक संरक्षण, गांडूळ खत उत्पादन, बियाणे प्रक्रिया, प्राण्यांची काळजी यासह विविध कृषि संबंधित प्रात्यक्षिके कृषीकन्यांमार्फत घेतली जातील.
या अभ्यासादौऱ्यास विद्यार्थ्यांना श्री संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान, मिरजगाव चे संस्थापक व अध्यक्ष डॉ. शंकरशेट नेवसे, अध्यक्षा सौ. कल्याणीताई नेवसे, सचिव श्री. राजेंद्र गोरे सर, प्रशासकीय अधिकारी श्री. सखाराम राजळे सर, समन्वयक श्री. राहुल म्हेत्रे सर, सद्गुरु कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामदास बिटे सर, कार्यक्रम समन्वयक प्रा. चांगदेव माने सर, कार्यक्रम अधिकारी प्रा. सुनंदा चाकणे मॅडम, महाविद्यालयातील इतर सर्व प्राध्यापक वर्ग आणि विषयक तज्ञांचे मार्गदर्शन लाभत आहे.

