shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्याकडून 100 वृक्षरोपांचे वाटप

वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्याकडून 100 वृक्षरोपांचे वाटप
पळसदेव (प्रतिनिधी):
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वाढदिवस साजरा करण्याचा आदर्श उपक्रम एल.जी. बनसुडे इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पळसदेव येथे राबविण्यात आला. इयत्ता 3 री इंग्लिशचा विद्यार्थी कु. प्रसाद रविराज खारतोडे याने आपल्या वाढदिवसानिमित्त शिक्षक व वर्गातील सर्व मित्र-मैत्रिणींना प्रत्येकी एक वृक्षरोप भेट देत पर्यावरणपूरक पद्धतीने वाढदिवस साजरा केला.
यावेळी प्रसादने शाळेमध्ये एकूण 80 वृक्षरोपांचे वाटप केले. तसेच शाळेच्या परिसरात वृक्षारोपणासाठी अतिरिक्त 20 वृक्षरोपे शाळेला भेट दिली. अशा प्रकारे त्याने एकूण 100 वृक्षरोपांचे योगदान देत पर्यावरण संवर्धनाची प्रेरणादायी कृती केली.
या उपक्रमाचे शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी मनापासून कौतुक केले. वाढदिवस केवळ केक कापून नव्हे, तर समाजोपयोगी व पर्यावरणपूरक उपक्रमातूनही साजरा करता येतो, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. हनुमंत (नाना) बनसुडे, उपाध्यक्ष डॉ. शितलकुमार शहा, कार्याध्यक्षा सौ. नंदाताई बनसुडे, सचिव श्री. सुरज बनसुडे, प्राचार्य श्री. संजय इंगोले, मुख्याध्यापिका सौ. सीमा बाराते, उपमुख्याध्यापिका सौ. सुवर्णा वाघमोडे, तसेच सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कु. प्रसाद रविराज खारतोडे याचे अभिनंदन करून त्याच्या पर्यावरणप्रेमी उपक्रमाचे कौतुक केले. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याने अशा समाजहिताच्या व पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन शाळेच्या वतीने करण्यात आले.
close