shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

खडकवासला कालव्यातून तरंगवाडी पासून मदनवाडी पर्यंतचे तलाव पाण्याने भरून घ्यावेत- हर्षवर्धन पाटील

खडकवासला कालव्यातून तरंगवाडी पासून मदनवाडी पर्यंतचे तलाव पाण्याने भरून घ्यावेत- हर्षवर्धन पाटील
इंदापूर: प्रतिनिधी दि.7/7/26 
                                         खडकवासला धरणामध्ये सध्या सुमारे 80 टक्के हून अधिक क्षमतेने पाणीसाठा निर्माण झाला आहे, त्यामुळे खडकवासला कालव्यामधून इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी पासून ते मदनवाडी पर्यंतचे 18 पाझर तलाव पाणी सोडून 100 टक्के क्षमतेने भरून घ्यावेत, अशी मागणी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी जलसंपदा विभागाकडे मंगळवारी (7) केली आहे.
        खडकवासला धरणातून कालव्यामध्ये मंगळवारी दुपारपासून पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे. या कालव्यातील पाण्यामधून इंदापूर तालुक्यातील मदनवाडी, पोंधवडी, भादलवाडी, कळस, पिलेवाडी, काळेवाडी, पळसदेव, लोणी देवकर, न्हावी, रुई, गागरगाव, बळपुडी, बिजवडी(वनगळी), वडापुरी, तरंगवाडी आदी 18 पाझर तलावांमध्ये पाणी सोडून ते पूर्ण क्षमतेने भरून घेणे संदर्भात हर्षवर्धन पाटील यांनी मुख्य अभियंता संजीव चोपडे यांच्याशी मंगळवारी चर्चा केली. सदरच्या सूचनेवर संजीव चोपडे यांनी सकारात्मक दर्शविली आहे. खडकवासला कॅनॉल मधून सदरचे पाझर तलाव पाण्याने भरून घेतल्यास परिसरातील नागरिकांना व जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी फायदा होणार आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
_____________________________
फोटो
close