इंदापूर पालखी सोहळा निर्विघ्न आणि सुरक्षित पार पडावा, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे - कृषिमंत्री दत्तात्रय भरणे.
इंदापूर : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग आला असून कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह प्रशासनाकडून इंदापूर येथील पालखी मार्ग, रिंगण मैदान आणि विसावा मंडपाची पाहणी( दि. 11 जुलै ) कारण्यात आली आहे
संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर इंदापूर शहरात प्रशासन सज्ज झाले आहे.पालखी सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी इंदापूरचे आमदार तथा राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रांताधिकारी, तहसीलदार, नगराध्यक्ष, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह पालखी मार्गाची पाहणी केली.
यावेळी रिंगण सोहळा होणाऱ्या मैदानासह वारकऱ्यांच्या विसाव्यासाठी उभारण्यात येणाऱ्या सभामंडपाची पाहणी करण्यात आली. तसेच पिण्याचे पाणी. स्वच्छता, वीज, आरोग्य सुविधा, वाहतूक आणि सुरक्षा व्यवस्थेबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
पालखी सोहळा निर्विघ्न आणि सुरक्षित पार पडावा, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या.

