*व्याहाळी प्राथमिक शाळा व अंगणवाडी येथे पंचायत समिती सदस्य रणजीत भोंग यांचे अचानक पाहणी; शालेय परिसर , विद्यार्थी गुणवत्तेबद्दल व्यक्त केले समाधान*
*व्याहाळी, ता. इंदापूर :-* जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, व्याहाळी (ता. इंदापूर) येथे पंचायत समिती सदस्य श्री. रणजीत भोंग यांनी भेट देत शाळेची पाहणी केली.
यावेळी त्यांनी शाळेचे दैनंदिन कामकाज, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, शालेय पोषण आहार, तसेच मॉडेल स्कूल योजनेअंतर्गत सुरू असलेल्या विविध विकास कामांची सविस्तर पाहणी केली. वर्गात जाऊन त्यांनी विद्यार्थ्यांच्या वह्या, हस्ताक्षर तपासले. शिक्षकांनी गुणवत्ता वाढीसाठी राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेतली.
विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. शाळेच्या भिंतीवर लावण्यात आलेले शैक्षणिक साहित्य, डिजिटल वर्ग आणि स्वच्छ परिसराबद्दल त्यांनी विशेष कौतुक केले. तसेच शिक्षक, विद्यार्थी व पालकांच्या एकत्रित प्रयत्नांचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी मुख्याध्यापक प्रभाकर लावंड, ग्रामविकास अधिकारी भारत मारकड, ग्रामपंचायत सदस्य सुयोग दिवसे, बापू मोरे, आबा पवार, शिक्षक तात्याराम धायतोंडे, कैलास गावडे, खुशाली धायतोंडे आदी उपस्थित होते. स्वागत संतोष हेगडे यांनी केले..

