विजयदादा गोरे यांचा, समाज विकासाचा ध्यास,
वडार समाजाच्या उन्नतीचा, हृदयामध्ये विश्वास!
काम करण्याची पद्धत न्यारी, ध्यास समाजाचा भारी,
विजयदादांच्या नावाने आज, वाजते नगारी!
हिरोजी ईटळकर मावळा, शिवरायांचा शूर वीर,
रायगडाची वास्तू घडविली, पराक्रम त्यांचा गंभीर;
अहिल्यानगरच्या भूमीवरती, गौरव झाला थोर,
प्रतिमेच्या लोकार्पणातून, इतिहास झाला जागा घोर!
ज्येष्ठ साहित्यिक टी. एस. चव्हाण, मानाचा तो सन्मान,
पत्रकार रमेश जेठे सरांच्या हस्ते, झाला गौरव महान;
हिरोजींच्या प्रतिमेला मिळाला, मान-सन्मान अपार,
शिवरायांच्या मावळ्याचा आज, घुमला जयजयकार!
वडार समाजावर प्रेम अपार, अंतःकरण त्यांचे सच्चे,
समाजासाठी वाहून घेण्याचे, स्वप्न मनीचे पक्के;
तरुणाईच्या हृदयामध्ये, विजयदादा नाव दुमदुमते,
त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन, नवी पिढी पुढे सरसावते!
ना दिखावा, ना स्वार्थ कुठला, कामामध्ये जिद्द भारी,
समाजहितासाठी सदैव धावती, वृत्ती त्यांची न्यारी;
जिथे गरज तिथे विजयदादा, मदतीचा हात पुढे,
वडार समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी, पाऊल त्यांचे पुढे!
विजयदादा नाव नुसते नाही, विश्वासाची ओळख झाली,
वडार समाजाच्या मनामनात, प्रेमाची पालखी निघाली;
शिवरायांचा आदर्श घेऊन, समाज उन्नतीची वाट,
विजयदादांच्या कार्यामुळे, उजळो समाजाची पहाट!
विजयदादा गोरे यांचा, समाज विकासाचा ध्यास,
वडार समाजाच्या उन्नतीचा, हृदयामध्ये विश्वास!
हिरोजींच्या शौर्याची गाथा, घराघरात पोहोचवू सारी,
विजयदादा गोरे यांचं कामच लई भारी—
होय भावा, कामच लई भारी!
प्रस्तुती: शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह म्युझिक टिम, अहिल्यानगर
गितकार:रमेश जेठे सर, जिल्हा अहिल्यानगर

