मुंबई:- शिवसेना ओबीसी बारा बलुतेदार विभागाचे राज्य संपर्क प्रमुख अनिल धमने पाटील आणि सोशल मिडीया राज्यप्रमुख संजय कुसळकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवळे आहे की, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्य मंत्री एकनाथ भाई शिंदे यांच्या आदेशानुसार व शिवसेनेचे मुख्य सचिव संजय मोरे, खा .डॉ.श्रीकांत शिंदे, प्रशांत पालांडे, यांच्या मागदर्शनाखाली ओबीसी नेते तथा शिवसेना ओबीसी बारा बलुतेदार विभागाचे प्रदेशाध्यक्ष अँड. डॉ पी बी कुंभार यांच्या नेत्तृत्वाखाली शिवसेना ओबीसी बारा बलुतेदार विभाग प्रदेश समन्वयक पदी भगवान सुरळके, आहिल्यानगर जिल्हाध्यक्ष पदी कैलास वाकचौरे यांची तर, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष पदी बाळासाहेब दुधाळे यांची नियुक्ती पत्र प्रदेशाध्यक्ष अँड. डॉ पी बी कुंभार यांच्या सही निशी देण्यात आले. यावेळी इतर पदअधिकारी यांची उपस्थिती होती.
सदर नियुक्ती पत्रावर वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण याचा आपण सक्रियपणे प्रचार प्रसार कराल व तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्व घटकांना सोबत घेऊन संघटन वाढवून कार्य कराल असा विश्वास व्यक्त करूण आपणास पुढील कार्यास शुभेच्छा देतोत असा उल्लेख नियुक्ती पत्रात केलेला आहे या निवडी बद्दल शिवसेना बारा बलुतेदार विभागाचे सर्व पदाधिकारी, शिवसैनिकांनी निवनिर्वाचित पदाधिकारी त्यांच्यावर शुभेच्छा चा वर्षाव केला जात आहे .
000

