shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
             🌍
  • आषाढी एकादशी निमित्त दत्ता धस पंत यांच्या कडून स्तुत्य उपक्रम..!!
  •              🌍
  • लाखो रुपसे खर्च दाखवूनही केज नगरपंचायतीच्या स्वच्छतेचे वाजले तीन तेरा!!
  •              🌍
  • चिखलात अडकलेला रस्ता, शेतकऱ्यांचा आक्रोश — “शेती करू तरी कशी?”
  •              🌍
  • ✨ तेजस्वी नेतृत्वाचा दीपस्तंभ – आमदार अभिमन्यूजी पवार साहेब ✨
  •              🌍
  • एरंडोलच्या तेजल महाजनचा ए.टी.डी.च्या परीक्षेत 100% गुण मिळवत गौरव; जळगाव भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सत्कार.
  • -->

    About Me

    शनेश्वर देवस्थान ट्रस्ट च्या माजी विश्वस्त डॉ वैभव शेटे ऑनलाइन पूजा ॲपची जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे केली चौकशी करण्याची मागणी.


    प्रतिनिधी मोहन शेगर सोनई 
     श्री शनेश्वर देवस्थान ट्रस्टचे माजी विश्वस्त वैभव सुखदेव शेटे पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन ऑनलाइन पुजा ॲपची  त्याचबरोबर पुजारी व ठराविक विभागातील कर्मचारी व अधिकारी यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना भेटून निवेदनाद्वारे केली आहे.          

                याबाबत अधिक माहिती अशी की   पीस शनिश्वर देवस्थान ट्रस्ट शनिशिंगणापूर मंदिर परिसरात ऑनलाइन पूजा ॲप तयार करून शनि भक्तांची लूट करणारी टोळी गेल्या अनेक वर्षापासून सक्रिय आहे  यात स्वतः देवस्थानचे पुजारी कर्मचारी व अधिकारी यांनी संगनमताने देवस्थानची फसवणूक करून करोडो रुपयाचा अपहार केला व निकटवर्ती याच्या नावे बेहिशोबी मालमत्ता जमविली आहे झालेल्या प्रकारावर पडदा टाकण्यासाठी देवस्थानच्या वतीने घाई घाईने लाईव्ह पूजा ॲप बंद करण्यात आले असले तरी वरील प्रकरणाची व्याप्ती पाहता कायद्याद्वारे शक्य असलेल्या सर्व यंत्रणा मार्फत या आर्थिक गुन्ह्याची चौकशी करण्यात यावी त्याचप्रमाणे पुजारी व ठराविक काही कर्मचारी अधिकारी यांचे बँक अकाउंट ची तपासणी करावी अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात डॉक्टर वैभव शेटे यांनी केली आहे यावर जिल्हा पोलीस अधीक्षक काय निर्णय घेतात याकडे सोनई परिसराचे लक्ष लागले आहे त्याचप्रमाणे छावा संघटनेचे रावसाहेब काळे यांनी देखील जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना निवेदन दिले आहे ऑनलाइन पूजा ॲप द्वारे कोट्यावधी रुपये देवस्थानच्या तिजोरीत गेले नाहीत भक्तांनी श्रद्धापूर्वक दिलेल्या पैशाचा भ्रष्टाचार झाला आहे याचा तपास करून संबंधितावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे ॲप चे दोन लाखाच्या पुढे सभासद आहेत त्यांच्याकडून प्रत्येकी अठराशे रुपये सभासद शुल्क घेतले आहे याशिवाय काँग्रेसचे कामगार विभाग अध्यक्ष संभाजी माळवदे यांनी सुद्धा याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन चौकशीची मागणी केली आहे याबाबत सोमवारी दिनांक 9 रोजी बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. 

    शनिशिंगणापूर देवस्थान मध्ये शनि देवाच्या ॲपच्या नावाने जे संचालक मंडळ असेल कर्मचारी असेल पुजारी असेल यांची सखोल चौकशी करून लाटलेले कोटी रुपये देवस्थानच्या तिजोरीत जमा करावे व त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा तसेच देवस्थानचा अधिकृत पुजारी कोण याचा खुलासा देवस्थान कडून करण्यात येवा अनिल निमसे.                                         सामाजिक कार्यकर्ते सोनई.     
                       
     सध्या देव एक प्रॉडक्ट आहे.                       
    ट्रस्टी पुजारी कर्मचारी स्थानिक हे त्यांचे विक्रेते आहेत आणि भाविक भक्त हे ग्राहक आहेत हे सुरळीत सुरू राहिलं तर सगळे आनंदी असतात पण तेथेच बोगसगिरी सुरू झाली तर मग सगळं गणित बिघडत त्याच क्षणी शिंगणापूर हे उदाहरण म्हणता येईल देवस्थानला विकास करण्यासाठी पैसे लागतात हे खरं आहे मात्र त्याचे एक प्रमाणात असायला हवं ौथर्‍यावर जायला जिथे पैसे मोजावे लागतात त्याच ठिकाणी येथील ठराविक कर्मचारी असे घोटाळे करतात सुरेश देशा नावाखाली लुटलं जातं तिथे देव खुश असेल का हाच मोठा प्रश्न आहे.             
    संदीप कुसळकर.                                 
    सामाजिक कार्यकर्ते सोनई
    close